अभिमानास्पद! रशियातील अणुऊर्जा संशोधन प्रकल्पासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 01:16 PM2020-12-11T13:16:35+5:302020-12-11T13:27:51+5:30

Indian students And Atomic Energy Research Project in Russia : भारतातून इंडियन इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉंलॉजीचे विद्यार्थी असणारे कौस्तुभ वाडेकर आणि रितेश रेड्डी सरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

Selection of Indian students for Atomic Energy Research Project in Russia | अभिमानास्पद! रशियातील अणुऊर्जा संशोधन प्रकल्पासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड

अभिमानास्पद! रशियातील अणुऊर्जा संशोधन प्रकल्पासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड

Next

मुंबई - रशियाच्या जॉईंट इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर रिसर्चच्या (जेएनआयआर) प्रकल्पासाठी भारतातून इंडियन इस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉंलॉजीचे विद्यार्थी असणारे कौस्तुभ वाडेकर आणि रितेश रेड्डी सरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे दोघेही केमिकल इंजिनिअरिंग (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमाचे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असून जगभरातील 12 देशांतून निवड झालेल्या 26 विद्यार्थ्यांमध्ये या दोघांचा समावेश आहे. या निमित्तानेअणुऊर्जा संशोधन प्रकल्पातील सहभागासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड ही अभिमानास्पद गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया त्यांना मिळत आहेत.

जेएनआयआरच्या संशोधन प्रकल्पासाठी निवड करताना कौस्तुभ व रितेशच्या आयसोल (आयएसओएल) मेथडची निवड झाली ज्यामध्ये आयसोल मेथडचा वापर हेवी बीम रिऍक्शन्सचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. याचा मुख्य उद्देश माशा इन्स्टॉलेशनला अपग्रेड करण्याचा असणार असल्याचे कौस्तुभने स्पष्टीकरण देताना सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे या प्रकल्पाचे सादरीकरण जेएनआयआरने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांकडून करून घेतले. 

आण्विक भौतिकशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संबंधित क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी जेआयएनआर ही एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. येथील प्रायोगिक उत्पादनांचा,संशोधनांचा वापर हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून औद्योगिक, वैद्यकीय,आणि इतर तंत्रिक विकास कामांध्येही केला जात आहे. जगभरातील 23 देशांहून अधिक देशांचे सहकार्य जेएनआयआरला मिळत आहे.

Web Title: Selection of Indian students for Atomic Energy Research Project in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.