Maharashtra Board HSC Results 2026 on mahresult.nic.in:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीचा निकाल आज, शनिवारी (दि. २ मे, २०२६) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अशा सर्व शाखांचे निकाल एकाच वेळी पोर्टलवर उपलब्ध होतील. निकाल कुठे पाहायचा आणि कसा पाहायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे:
निकालासाठी अधिकृत संकेतस्थळे (Official Links)
विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात:
mahahsscboard.in
results.digilocker.gov.in
hscresult.mkcl.org
results.navneet.com
How to Check: ऑनलाईन निकाल पाहण्याच्या स्टेप्स
बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा:
१) वेबसाईटला भेट द्या: वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळांपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा.
२) HSC Result 2026 निवडा: होमपेजवर 'HSC Examination Result March 2026' या लिंकवर क्लिक करा.
३) तपशील भरा: तुमचा 'Seat Number' (आसन क्रमांक) आणि 'Mother's First Name' (आईच्या नावातील पहिली तीन अक्षरे) प्रविष्ट करा.
४) निकाल पहा: सर्व माहिती भरल्यानंतर 'View Result' या बटणावर क्लिक करा.
५) डाऊनलोड करा: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट आउट (Print Out) किंवा डिजिटल प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि पुढील प्रक्रिया
Digilocker: विद्यार्थी आपली डिजिटल गुणपत्रिका Digilocker App मध्ये देखील संग्रहित करून ठेवू शकतात.
गुणपडताळणी (Verification): निकालात काही शंका असल्यास ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल.
पुनर्मूल्यांकन: उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे अनिवार्य आहे.
श्रेणीसुधार: उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी 'Class Improvement Scheme' अंतर्गत आगामी तीन परीक्षांच्या संधी उपलब्ध असतील.
Web Summary : Maharashtra Board HSC results for 2026 will be declared online today, May 2nd, at 1 PM. Students can check results on mahahsscboard.in and digilocker.gov.in. Verification available May 3-17.
Web Summary : महाराष्ट्र बोर्ड एचएससी 2026 के परिणाम आज, 2 मई को दोपहर 1 बजे ऑनलाइन घोषित किए जाएंगे। छात्र mahahsscboard.in और digilocker.gov.in पर परिणाम देख सकते हैं। सत्यापन 3-17 मई तक उपलब्ध।