शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा ..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 11:13 AM

पास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी 

ठळक मुद्देपास- नापास नाही, तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम 

पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजे त्यांच्या आवडी निवडी, उपक्रमामधील सहभाग, परिवार अभ्यासाविषयी, सामान्य ज्ञानाविषयी असलेली माहिती आणि गणिताची सांडगी आकडेमोड, भाषेतील अक्षरांची शब्दांची ओळख व वाक्यरचना हे सारे असते. याचसोबत अंतिम निकालावर असते ती त्याचे वजन, उंची, खेळातील सहभाग यांच्याविषयीची माहिती असते. एकूणच आकारिक आणि संकलित मूल्यमापन या दोन्हीचा समावेश अंतिम निकालात असतो आणि त्या आधारावर त्यांचे गुणांकन केले जाते. मात्र यंदा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या संकलित मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना वर्गोन्नतचा शेरा निकालावर मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणच घेतले नाही किंवा उपस्थिती नाही त्यांचे मूल्यांकन करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. 

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी ? निकाल कसा द्यावा यासंबंधी मार्गदर्शक सूचना शाळांना दिल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नसल्याने शाळांना आणि तेथील शिक्षकांना विद्यर्थ्यांचे संकलित मूल्यमापनही करता आलेले नाही. त्यामुळे आरटीई कलम १६ च्या नियमानुसार प्रतिपुस्तकावर आरटीई ऍक्ट १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा देण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फक्त संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्याची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्या काही छोट्या परीक्षा, चाचण्या घेण्यात आल्या आहेत त्यानुसार यंदा त्यांना गुणदान करून त्यांचे श्रेणीत रूपांतर करून त्यांना सदर शेरा देण्यात येईल अशी माहिती कुर्ला येथील शिशु विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी दिली.संकरित आणि आकारिक मूल्यमापन याना ५० - ५० गुणांची विभागणी करून हे मूल्यमापन करणे अपेक्षित होते मात्र अनेक विदयार्थ्यांची ऑनलाईन अनुपस्थिती, उपक्रमात असलेला प्रत्यक्ष सहभागाचे यांमुळे या सगळ्याला मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले. 

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम एससीईआरटीकडून नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन होऊ शकले नाही त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई शेरा नमूद करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारच्या विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच एससीईआरटीकडून तयार करण्यात आलेल्या विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी, सोबत नियमित वर्ग शिकवणीची प्रक्रयाही पूर्ण करावॆ से स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एससीईआरटीकडून  शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार त्याचं सूचना स्वतंत्रते देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील पहिली ते चौथी विद्यार्थी संख्या पालिका - डिव्हायडी (उपसंचालक कार्यालय अखत्यारीतील)

  • पहिली - १३१८९५- २४३४० 
  • दुसरी - १३३३८१- २५२२२
  • तिसरी - १४०५७८- २५४९२ 
  • चौथी - १४६५२५- २४९३३

वर्षभरापासून घरात असल्याने आता सुट्टीचाही कंटाळा आला आहे. शाळा सुरु असती तर मित्रांना भेटलो असतो, खेळलो असतो आणि अभ्यासही झाला असता. - श्रवण राणे, चौथी, नरवडे प्राथमिक विद्यामंदिर आता ऑनलाईन अभ्यासाचा कंटाळा आहे. प्रगतीपुस्तक हातात आले नाही. मात्र आम्ही पास आहोत हे माहिती आहे. मात्र शाळा आता लवकरात लवकर सुरु व्हायला हवी. शिक्षकांसोबत शाळेत अभ्यास जास्त चांगला होतो. किमया आचरेकर, चौथी, दहिसर विद्यामंदिर 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या