शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ब्रिटनमध्ये आश्रयासाठी पाकिस्तानी बनताहेत ‘गे’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:07 IST

International News: पाकिस्तानी लोक काय काय करतील याचा खरंच काहीच भरवसा राहिलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही बाबतीत आता बांगलादेशानंही त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. खड्ड्यात चाललेल्या आपल्या देशात आता आपलं काहीच भवितव्य उरलं नसल्याचं काळल्यानं अनेक पाकिस्तानी नागरिक आपला देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेत आहेत.

पाकिस्तानी लोक काय काय करतील याचा खरंच काहीच भरवसा राहिलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही बाबतीत आता बांगलादेशानंही त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. खड्ड्यात चाललेल्या आपल्या देशात आता आपलं काहीच भवितव्य उरलं नसल्याचं काळल्यानं अनेक पाकिस्तानी नागरिक आपला देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेत आहेत. त्यात अरब देशांसह ब्रिटनसारख्या देशाचाही समावेश आहे.

व्हिसाची मुदत संपल्यावर कोणालाही त्या देशात राहता येत नाही आणि तो देश त्यांना सोडून परत आपल्या मायदेशी जावं लागतं, हा जगभराचा नियम आहे. पण इतर देशांमध्ये गेलेल्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना तो देश सोडायचा नसतो आणि मायदेशीही परतायचं नसतं. पण त्यासाठी त्यांनी काय काय शक्कल लढवाव्यात? 

ब्रिटनसारखे काही उदार देश अशा नागरिकांना आपल्या देशात आश्रय देतात, ज्या लोकांना आपल्या मायदेशात धोका असतो. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे समलैंगिक संबंध ठेवणं कायद्याने गुन्हा आहे. याच नियमाचा गैरफायदा घेऊन अनेक पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी स्वत:ला समलैंगिक, गे असल्याचं भासवायला, तशी बनावट प्रमाणपत्रं मिळवायला सुरुवात केली आहे. आम्ही समलैंगिक असल्यानं आमच्या देशात आम्हाला धोका आहे असं सांगून त्यांनी ब्रिटनमध्ये ‘आश्रय’ मिळवायला सुरुवात केली आहे. यासाठी अनेक ‘दलाल’ही तिथे तयार झाले आहेत. ते मोठी फी उकळून ब्रिटनमध्ये असलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना ‘गे’ सर्टिफिकेट्स मिळवून देत आहेत. यासंदर्भातलं एक मोठं स्कॅण्डल नुकतंच उघडकीस आलं आहे.बीबीसीच्या अहवालानुसार, इमिग्रेशन सल्लागार हजारो पाउंड घेऊन खोटी कागदपत्रे त्यांना तयार करून देतात. ज्यांचा व्हिसा संपणार असेल, त्यांना बनावट कथा सांगितल्या जातात आणि खोटे पुरावे तयार करण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. विशेषत: ज्यांचे स्टुडंट, वर्क किंवा टुरिस्ट व्हिसा संपलेले असतात, अशा लोकांना त्यासाठी हेरलं जातं.

आम्ही ‘गे’ आहोत, त्यामुळे आम्हाला ब्रिटनमध्ये राहू द्यावं अशी विनंती करणारे किती अर्ज ब्रिटनमध्ये दाखल होत असावेत? २०२५ मध्ये एकूण आश्रय अर्जांपैकी सुमारे ३५ टक्के अर्ज अशा प्रकारचे होते आणि त्यांची एकूण संख्या १ लाखाहून अधिक होती! ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर आश्रय मागणाऱ्यांमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर होता, त्यानंतर बांगलादेशचा क्रमांक होता. हा घोटाळा आणि हे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ब्रिटनच्या गृह मंत्रालयानं म्हटलं आहे, जो कोणी अशाप्रकारे ब्रिटनच्या उदारमतवादाचा गैरवापर आणि गैरफायदा घेताना आढळेल, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यात देशाबाहेर हकालपट्टीचाही समावेश आहे. 

पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी ब्रिटनमध्ये आश्रयासाठी आणि बनावट दाव्यांसाठी मुख्यत: तीन गोष्टींचा आधार घेतला होता. त्यातल्या बहुतेकांनी लैंगिक ओळखीच्या आधारावर छळ, आमच्या विशिष्ट धार्मिक श्रद्धांमुळे आणि राजकीय विचारांमुळे धोका.. ही कारणं त्यासाठी नमूद केली होती. त्यामुळे पाकिस्तानातून येणाऱ्या नागरिकांना व्हिसा देणं तातडीनं थांबवा, अशी मागणी ब्रिटनमध्ये जोर धरू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! Pakistanis posing as 'gay' for UK asylum.

Web Summary : Pakistanis and Bangladeshis are falsely claiming to be gay to seek asylum in the UK, exploiting its liberal policies. They obtain fake certificates, citing persecution in their home countries due to same-sex relations. The UK is cracking down on this abuse.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानEnglandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय