शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांसाठी आर्थिक मंदीमध्येच संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 05:13 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जबरदस्त दिवाळी धमाका केला आहे.

- उमेश शर्माअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जबरदस्त दिवाळी धमाका केला आहे. भारताच्या आर्थिक क्षेत्रात कंपन्यांना आयकरात सवलत देऊन ‘मंदीमध्येच असते संधी’ हे दाखवून दिले आहे. आता संधी आली आहे नवीन उत्पादन कंपन्या भारतात सुरू करण्यास. भारतात ‘मेक इन इंडिया’ या योजनेला खूप मोठे प्रोत्साहन मिळेल.आर्थिक मंदी दूर करण्यासाठी उचललेल्या पूर्वीच्या योजना जसे बँक विलीनीकरण, बांधकाम क्षेत्राला कर्ज व सवलतीच्या योजना, शेअर मार्केटच्या उत्पनावरील फॉरेन सरचार्ज कमी करणे, आरबीआयतर्फे शासनाला आर्थिक मदत, जीएसटीतील सरलता, इत्यादी योजनांपेक्षाही सर्वात मोठी, दूरगामी व धाडसी सवलत योजना आहे. यामुळे भारतात उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल व त्यातून रोजगार, आर्थिक चालना वाढेल. अमेरिका व चीनच्या आर्थिक भांडणात भारताचा लाभ होईल व अ‍ॅप्पलसारख्या टेलिकॉम कंपन्या, आॅटोमोबाइल इत्यादी उत्पादन कंपन्या चीनमधून भारतात उत्पादन स्थलांतरित करू शकतील. येणाऱ्या काळात खूप मोठा परिणाम होणार आहे, असे दिसत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रमुख प्रस्तावित सवलती पुढीलप्रमाणे१) नवीन कंपन्यांना मोठी सवलत : मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आॅक्टोबर २०१९ नंतर स्थापन झालेल्या कंपन्यांना १५ टक्के आयकर भरावा लागेल. याचा अर्थ ५० टक्के आयकर कमी लागेल.२) नवीन कंपन्यांना मिनिमम अलर्टनेट टॅक्स भरावा लागणार नाही.३) जुन्या कंपन्यांना करकपात : ज्या कंपन्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेत नाहीत त्या कंपन्यांसाठी प्रभावी करदर ३५ टक्क्यांवरून २५.१७ टक्क्यांपर्यंत करण्यात येईल, ज्यामध्ये सरचार्जचाही समावेश आहे. अशा कंपन्यांना मॅट भरावा लागणार नाही. कॉर्पोरेट प्रभावी कर दर सवलतीशिवाय २२ टक्के असेल.४) जुन्या कंपन्या ज्या सवलती घेतात त्यांना करकपात : ज्या कंपन्या सवलतीचा फायदा घेतात, त्या कंपन्यांनी पूर्वसुधारित दराने कर भरणे सुरू ठेवावे. या कंपन्या सुधारित कमी कर व्यवस्थेची निवड करू शकतात किंवा २२ टक्के दराने कर भरण्याच्या पर्यायाची निवड करू शकतात.
५) ज्या कंपन्या सरचार्ज आणि सेस भरतील त्या कंपन्यांसाठी मॅटचा दर १८.५ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आला.६) ज्या लिस्टेड कंपन्यांनी जुलै २०१९ पूर्वी बायबॅक केले त्या कंपन्यांना शेअर बायबॅकवर कर आकारला जाणार नाही.७) निधीचा प्रवाह स्थिर भांडवल बाजारात करण्यासाठी फायनान्स अ‍ॅक्ट २०१९ ने सुरू केलेला सरचार्ज कॅपिटल गेन्सवर लागू होणार नाही.८) इन्क्युबेटर आणि सार्वजनिक अनुदानित विद्यापीठे, आयआयटी, राष्ट्रीय प्रयोगशाळा इत्यादी खर्चाचा समावेश २ टक्के सीएसआरमध्ये करण्यात आला आहे.९) फंपिआॅयवरील कॅपिटल गेन्सवर सरचार्ज लागू होणार नाही.( सी.ए.)

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन