शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

बळीराजाच्या नाडवणुकीची नवी त-हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 5:15 PM

मिलिंद कुलकर्णी आपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. लोकसंख्येच्या ६० ते ७० लोक शेतीवर अवलंबून आहेत. ...

मिलिंद कुलकर्णीआपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. लोकसंख्येच्या ६० ते ७० लोक शेतीवर अवलंबून आहेत. बळीराजाच्या अपार कष्ट आणि अमर्याद मेहनतीतून अन्नधान्याविषयी आपण स्वयंपूर्ण होऊ शकलो. हरितक्रांती, धवलक्रांती ही बळीराजाने तंत्रज्ञानाची अनोखी जोड दिल्याने शक्य झाली आहे, असे आपण कृषीक्षेत्र आणि बळीराजाच्या सन्मानासाठी नेहमी म्हणत असतो. हे शंभर टक्के सत्य असले तरी बळीराजाच्या मदतीसाठी सरकार, शास्त्रज्ञ, समाज या पातळीवर अजूनही उदासीनता आहे. नाव शेतकऱ्याचे आणि भले भलत्याचे असा सगळा प्रकार आहे. डझनभर शेतकरी संघटना अस्तित्वात असल्या तरी त्यांचे विषय हे मूठभर शेतकऱ्यांच्या हिताचे राहिलेले आहेत. राजकीय पक्षांची तर सत्ताधारी आणि विरोधक या भूमिकेत विभागणी झाल्याने त्यांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष शेतकरी हिताची बाजू हिरीरीने मांडत असतो, मात्र तोच पक्ष जेव्हा सत्तेत सहभागी होतो, तेव्हा त्याची भाषा बदलली असते. शेतकरी संघटित नसल्याने त्यांच्या प्रश्नांना, व्यथांना वाचा फोडली जात नाही. अस्मानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे तो झेलत असतो. स्वत: उत्पादन केलेल्या मालाचा भाव ठरवू शकत नसलेला एकमेव व्यवसाय हा शेती आहे.शेतकºयाची लुबाडणूक आणि नाडवणूक किती प्रकारे आणि किती पातळींवर होत असते याची जंत्री मांडायची ठरवली तर ती हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाईल. अगदी बी-बियाणे, किटकनाशके आणि खतांपासून तर वीज, पाणी, धान्य विक्रीपर्यंत लुबाडणूक होत असते. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर पंचनाम्यापासून तर बँकेत नुकसानभरपाईची रक्कम जमा होईपर्यंत किती संघर्ष करावा लागतो, हा एखाद्या कथा, कादंबरीचा विषय होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यातील बिडगाव परिसरात वादळामुळे वीजेचे खांब कोसळले. ८० तास वीजपुरवठा खंडित होता. बागायती कापसाचे अंकूर शेतकºयासमोर जळत होते, पण तो काहीही करु शकला नाही. ही हतबलता जिवघेणी असते, हे समजून घ्यायला संवेदनशीलता हवी.लुबाडणुकीची नवी तºहा आता समोर आली आहे. नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही शेतकºयांनी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी उस तोडणी करणाºया ठेकेदाराला बैलजोड्या आणि गाड्या भाड्याने दिल्या होत्या. रब्बी पिकाची शाश्वती नसल्याने आॅक्टोबर महिन्यात अनेक शेतकरी बैलजोड्यांसह गाड्या भाड्याने देत असतात. कोरडवाहू शेतकºयांनी उत्पन्नाचा हा नवा मार्ग अवलंबला आहे. करार करुन जूनपर्यंत या गाड्या दिल्या जातात. खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी त्या परत घेऊन नियमित शेतीकाम सुरु करतात. नगर आणि खान्देश हे अंतर लक्षात घेता हा सगळा विश्वासावर चालणारा व्यवहार असतो. शेतक-यांच्या भोळेपणाचा फायदा उठवत ठेकेदाराने एकीकडे बैलजोड्या परस्पर विकून टाकल्या आणि पुन्हा शेतक-यांना नोटीस पाठवून पैसे घेणे असल्याचे कळविले. शेतक-यांनी अमळनेर, नगर पोलिस स्टेशन गाठून कैफीयत मांडली, पण उपयोग झाला नाही. नंदुरबारचे शेतकरी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असताना अमळनेरच्या १४ शेतक-यांनी दुष्काळ पाहणी दौ-यावर आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ही व्यथा मांडली. त्यांनी दखल घेतल्याने पोलीस दल सक्रीय झाले आणि ठेकेदाराला अटक झाली. प्रत्येक शेतकºयाला बैलजोडी ४० हजार रुपये त्याने परत केले. पाटील यांच्या सक्रीयतेचे कौतुक आहेच, पण पोलीस स्टेशनने सुरुवातीलाच दखल घेतली असती तर शेतकºयांना हेलपाटे आणि मानसिक त्रास झाला नसता. शेतकºयाच्या असहायतेचा फायदा असा सर्वत्र घेतला जात असतो, हे या प्रकरणातून पुन्हा एकदा दिसून आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव