शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

नाशिक शिक्षण प्रसार मंडळाची शतकोत्तरी वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 9:36 AM

उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक ही संस्था १ मे रोजी १०२ वर्षे पूर्ण करून १०३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा आढावा...

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय ऐक्य व स्वातंत्र्याविषयी भावना जनतेत निर्माण होण्यासाठी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचा आक्र मकपणेपुरस्कार केला. यातूनच राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ संपूर्ण देशभर सुरू झाली.  स्वावलंबनाने स्वत:च्या पायावर उभी राहणारी व देशाभिमानी समर्थ तरु ण पिढी निर्माण होईल, असे शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण संस्था सुरू कराव्यात असे टिळकांनी आवाहन केले. त्यानसार नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापन करण्यात आली. आज या संस्थेची शतकोत्तरी वाटचाल सुरू आहे आणि तीही राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रेरणेतूनच!

स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांच्या या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या विचारांनी प्रेरित होवून राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने कै. शि. रा. कळवणकर, कै. शि. अ. अध्यापक, कै. रं. कृ. यार्दी, कै. लं. पां. सोमण, कै. वा. वि. पाराशरे या राष्ट्रभक्त व ध्येयवादी तरुणांनी नाशिकमध्ये १ मे १९१८ रोजी न्यू इंग्लिश स्कूल सुरु केले व त्याचवेळी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. प्रारंभी सुरु केलेले न्यू इंग्लिश स्कूल हेच आता जु. स. रुंगटा हायस्कूल या नावाने सर्वांना सुपरिचित आहे.

‘संहती : कार्य साधिका’ म्हणजेच एकीने कार्यिसद्धी. संस्थेच्या या ब्रीदवाक्याप्रमाणे संस्थेचे सर्व घटक, समाजातील दानशूर व हितचिंतक, माजी विद्यार्थी यांच्या एकित्रत प्रयत्नाने व परिश्रमाने संस्था गेली १०२ वर्षे शैक्षणकि क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करित आहे. आज संस्थेचा विस्तार पाहता नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या संकुलातून पूर्वप्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत तसेच तांत्रिक शिक्षण अशा एकूण ४३ शाखांमध्ये ज्ञानदानाचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. दिवसा नोकरी करणार्या परंतु शिक्षणाची आवड असणाºया कष्टकरी व गरजू विद्यार्थ्यांसाठी गेल्या ६७ वर्षांपासून जु. स. रुंगटा हायस्कूल, नाशिक येथे नाईट हायस्कूल सुरु आहे. त्यापुढील प्रगतीचा टप्पा म्हणून संस्थेने नाशिकरोड येथे रात्र महाविद्यालय सुरू केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचिवण्याचा संस्था प्रयत्न करीत आहे.

विद्यार्थ्यांच्या अंगी असणाºयाया सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी व सामाजिक बांधिलकीच्या भावनेने संस्था अनेक दशकांपासून विविध उपक्र मांचे, कार्यक्र मांचे आयोजन करित आहे. यात प्रामुख्याने गुरु वर्य रं. कृ. यार्दी स्मृती व्याख्यानमाला, कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा, कै. लेले सूर्यनमस्कार स्पर्धा, कै. ल. पां. सोमण वकृत्व स्पर्धा, क्रांतीवीर काथे बंधू स्मृती व्याख्यान व वकृत्वस्पर्धा, कै. सौ. लक्ष्मीबाई लेले वकृत्व स्पर्धा, क्रि डा महोत्सव, कृतज्ञता सोहळा, संस्कृतीज्ञान परीक्षा अशा विविध उपक्र मांचे आयोजन संस्था सातत्याने करित आहे. संस्थेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धापरीक्षा यांसाठी सीव्ही रामन टॅलेंट सर्च अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. तसेच संस्थेने २००६ पासून मराठी माध्यमाच्या शाळांना नवसंजीवनी देणारा केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असणारा फंक्शनल इंग्लिश कोर्स सुरू केला आहे.

आजपर्यंत कित्येक पिढ्या संस्थेतील शाळा-शाळांनी घडविल्या आहेत. शंभर वर्षात लाखो विद्यार्थी संस्थेच्या शाळा-शाळांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले. आज ते वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करित आहेत. संस्थेला माजी विद्यार्थ्यांचा मोठा वारसा लाभलेला आहे. यात कविवर्य कुसुमाग्रज, माधव मनोहर, दत्ता भट, शिवाजी तुपे, गोविंदराव देशपांडे, बापू नाडकर्णी, शेतकरी संघटनेचेनेते शरद जोशी, माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, अभिनेते गिरीश ओक, डॉ. रमेश रासकर यांसारखे अनेक दिग्गज माजी विद्यार्थी लाभले आहेत.

संस्थेने २०१७-१८ हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून दिमाखदारपणे व उत्साहाने साजरे केले. या शतकमहोत्सवाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या शतकमहोत्सवी वर्षात सूर्यनमस्कार - एक अविष्कार या उपक्रमात संस्थेच्या विविध शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सुमारे दीड कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्र म केला. वर्ल्ड रेकॉर्डऑफ इंडिया व वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांचे दोन नवे विश्वविक्र म करून संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकले आहे.- अश्विनीकुमार भानुदास येवलासेक्रेटरी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ

 

 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनNashikनाशिकStudentविद्यार्थीEducationशिक्षण