शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जय हिंद.. जय महाराष्ट्र !

By सचिन जवळकोटे | Published: March 21, 2021 6:57 AM

लगाव बत्ती...

सचिन जवळकोटे

‘दक्षिण’मध्ये दोन मातब्बर नेते. माने अन्‌ देशमुख. या दोघांना शह देण्यासाठी ‘जनवात्सल्य’नं ‘जयहिंद’चा तगडा योद्धा मैदानात उतरविलाय. माने-देशमुख. दुसरीकडं पंढरीतल्या नव्या पक्षप्रवेशाची अफवा ‘चंद्रभागा’तीरी रंगलीय. आजपर्यंत त्यांनी एवढ्या पक्षांना ‘जय महाराष्ट्र’ केलाय की त्यांची प्रत्येक अफवा आता लोकांना खरी वाटू लागलीय.

पॉलि ‘ट्रिक्स’

स्थळ : मुंबईतलं हॉस्पिटल. अक्कलकोटचे ‘सिद्धाराम’अण्णा उपचारासाठी दाखल झालेले. संपत चाललेल्या सलाईनकडं पाहत झोपलेले. कधी एकदा डिस्चार्ज मिळतो अन्‌ कधी एकदा अक्कलकोटला जाऊन ‘सचिनदादां’च्या गटामागं ‘तानवडें’चा भुंगा सोडतो, याचा ते विचार करू लागलेले. एवढ्यात त्यांचा मोबाइल वाजला. नेहमीप्रमाणं ‘दक्षिण’चे ‘हसापुरे’ कानाला लागलेले, ‘अण्णाऽऽ ब्रेकिंग न्यूज. जयहिंदवाले माने-देशमुख आपल्या पार्टीत आलेत. इग हॅन्ग आग्यादू ?’हे ऐकताच ‘अण्णा’ दचकले. सुई टोचतानाही कधी कपाळावर आठ्या पडल्या नसतील एवढा चेहरा त्रासिक बनला; कारण ‘ब्रेकिंग’च तशी होती ना.  ‘आधीच अक्कलकोटमध्ये आमच्या-आमच्यात मारामारी. माइकपासून पिस्तुलापर्यंत सारी शस्त्रं वापरून आम्ही थकलेलो. आताा गुपगुमान बसलेलो. त्यात पुन्हा हे नवं उसाचं कांडकं कुठं डोक्यावर घेऊन नाचायचं?’ असा गहन प्रश्न इंजेक्शनच्या सुईसारखा त्यांना टोचू लागला. इकडं ‘दक्षिण’मध्येही अशीच अवस्था आणखी दोन नेत्यांची झाली. ‘भंडारकवठ्या’चे ‘सुभाषबापू’ अन‌् ‘कुमठ्या’चे दिलीपराव’ हे दोघेही साखरसम्राट. दोघेही मूळचे ‘उत्तर’चे; मात्र ‘दक्षिण’ प्रांत जणू आपल्यासाठीच राखून ठेवलाय या आविर्भावात राजकारण करीत आलेले. आता या दोघांसमोर आणखी एक ‘साखरसम्राट’ आणून ठेवला गेलाय. ‘जयहिंद’ची साइट अक्कलकोट प्रांतात असली तरी या ‘गणेशरावां’नी म्हणे पुढच्या आमदारकीची लागवड ‘दक्षिण’मध्ये करण्याचा निर्णय घेतलाय. ‘राजूर’नंतर कधीच स्थानिक आमदार पाहू न शकलेली सीनाकाठची बिच्चाऽऽरी जनता या नव्या गेमोगेमीमुळं पार दचकून गेलीय.नगरचे विखे-पाटील  ‘कमळ’ घेऊन विरोधक बनलेत; मात्र त्यांचे जावईबापू ‘पटोलें’च्या ‘हातात हात’ देऊन नवा राजकीय चमत्कार घडवायला निघालेत. यामागचे कर्ते-करविते कोण याचा शोध घेऊन खुद्द ‘हात’वाले कार्यकर्तेच थकलेत, कारण खूप कमी मंडळींना ‘अंदर की बात’ ठावूक. खुद्द ‘जनवात्सल्य’ बंगल्यावरच ही समीकरणं जुळविली गेलेली.‘सुशीलकुमारां’नी हा योग जुळवून आणलेला. एकाच दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न झालेला. एकीकडे अक्कलकोटमध्ये ‘सिद्धाराम’अण्णांना पर्याय देण्याचा प्रयत्न; कारण ‘खर्गें’सोबतची परस्पर जवळीक बरोबर डोक्यात ठेवली गेलेली. दुसरीकडं ‘दक्षिण’मध्येही ‘माने अन्‌ देशमुख’ यांना शह देण्यासाठीही ‘माने-देशमुख’ कामाला आलेले; कारण या दोघांचेही बरेच जुने हिशोब ‘जनवात्सल्य’ला चुकते करायचेत. लगाव बत्ती..

कुणाचं कल्याण..         .. कुणाचं समाधान

दुसरीकडं अजून एका साखरसम्राटांच्या पक्षांतराची कुजबूज चंद्रभागेकाठी रंगू लागलीय. नदीचं नाव चंद्रभागा. कारखान्याचंही जुनं नाव चंद्रभागाच. पंढरीच्या तिकीटाची जेवढी उत्सुकता, तेवढीच  ‘कल्याणराव’ हातात ‘घड्याळ’ बांधणार का, याचीही जोरात चर्चा. आज ‘अजितदादा’ अन्‌ ‘जयंतदादां’च्या उपस्थितीत तशी घोषणा होणार अशीही अफवा. आजपर्यंत ते एवढे पक्ष फिरून आलेत की, नव्या प्रवेशाची अफवाही लोकांना खरीच वाटते. गेल्या वर्षी ‘तुमच्या कारखान्याला मदत कशी मिळते, ते बघतोच’ असा ‘दादास्टाइल दम’ मिळाल्यानंतर धास्तीपायी दवाखान्याची पायरी चढायची वेळ आलेली; मात्र आता पंढरीची राजकीय परिस्थिती झपाट्यानं बदलतेय. ‘थोरल्या काकां’नी सांगितल्यामुळं  ‘काळें’चं ‘कल्याण’ करण्याकडं म्हणे ‘अजितदादां’चा कल वाढलेला.दुसरीकडं ‘रणजितदादा अकलूजकरां’नीही पंढरीचा वाडा की दामाजीचा वाडा याची चाचपणी करण्यासाठी पंढरीत अनेकांच्या गाठीभेटी घेतलेल्या. ‘उमेशपंतां’चा उत्साह ओसंडून चालला असला तरी ‘प्रशांतपंत’ एकदम शांत दिसू लागलेले. त्यांची इच्छा नसेल तर मंगळवेढ्याला तिकीट देण्याचं ‘समाधान’ नागपूरच्या ‘पंतां’ना मिळू शकतं. मात्र, पक्षावरचा ‘रिमोट’ गमाविण्याची मानसिक तयारी पंढरीच्या ‘पंतां’ची नाही. तसंच ‘भगीरथ’ प्रयत्न करूनही घरातील  ‘मातोश्रीं’नाच  ‘घड्याळा’ची उमेदवारी मिळाली तर ‘साधनाताईं’चाही विचार केला जातोय. मात्र, ‘मोहोळ पॅटर्नप्रमाणे रिमोट तुमच्या हातात ठेवून मला आमदार करा. सह्यांसह लेटरहेड वाड्यावरच राहतील,’ अशीही अफलातून स्कीम  ‘शैलाताईं’च्या गटातून सादर केली गेलीय. ‘गोडसे’ घराणं आमदारकीसाठी ‘यशवंत’ बनायला उत्सुक असलं तरी ‘पाटलां’च्या भूमिकेत वावरायला ‘पंतां’ची मानसिकता आहे काय, हे वाड्यालाच ठावूक. तोपर्यंत...

क्राईम ‘स्पॉट’सोलापुरी ‘वाझे’ !

मुंबईच्या ‘वाझे’नं अख्ख्या ‘मीडिया’ला कामाला लावलंय. एक साधा एपीआय डझनभर इम्पोर्टेड कार वापरत होता, हे पाहून सारेच अवाक्‌ झालेत. मात्र असे कैक ‘वाझे’ आजपावेतो सोलापूरकरांनी पाहिलेत. ‘वाझे’ किमान ‘थ्री स्टार’वाला ऑफिसर तरी होता; पण इथले किरकोळ वसूलदार तर आलिशान ‘फॉर्च्युनर’मध्ये फिरतात. कुणी ‘वाळूमाफिया’ बनलाय, तर कुणाला ‘इस्टेटकिंग’ उपाधी चिकटलीय. गेल्या दशकात ‘डान्सबार’ जेव्हा मोकाटपणे सुरू होते, तेव्हा हेच वसूलदार बिनधास्तपणे पार्टनर बनले होते. सावकारकीतही ‘काळा’ पैसा गुंतवून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतलंय. त्यामुळं सोलापूरकरांच्या दृष्टीनं ‘वाझे बोले तो किस झाड की पत्तीऽऽ’

सोशल’ टचसोलापूरकरांचं ‘चिमणी’प्रेम..

काल ‘जागतिक चिमणी दिन’ जगभर साजरा झाला. खरंतर सोलापूरच्या ‘चिमणी’ला थेट जागतिक स्तरावर पोहोचविण्याचं काम इथल्या अनेक कार्यकर्त्यांनी केलेलं. इथल्या ‘चिमणी’ला वाचविण्यासाठी स्थानिक नेते तर सोडाच बारामतीच्या ‘काकां’नीही जिवाची पराकाष्ठा केलेली. इथली ‘चिमणी’ टिकली तरच शेतकरी जगला, ही भावनिक तळमळही साखरसम्राटांनी वेळोवेळी व्यक्त केलेली. पुणेरी सोलापूरकरांनीही या  ‘चिमणी’साठी गुपगुमान ‘इंटरसिटी’नं गाव सोडलेलं. या ‘चिमणी’च्या भीतीपोटी भल्यामोठ्या विमानांनीही इथं घिरट्या घालणं बंद करून टाकलेलं. चिमणी लय भारी. हॅपी चिमणी डे..!

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखाने