शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळा, उन्हाळा, पावसाळ्यात बदलणारी भारत-नेपाळमधील 'बॉर्डर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:32 IST

नेपाळच्या डोंगराळ भागात राहणारे नागरिक हिवाळ्याच्या दिवसांत नदीपात्राच्या खालच्या पट्ट्यात स्थलांतर करतात. ते सीमेला लागून असलेल्या भारतातील पठारी प्रदेशामध्ये कामधंदा करतात. त्यांची कागदोपत्री कुठे नोंद नसते. नेपाळी लोकांना भारतात येऊन काम करण्याची आणि मालमत्ता करण्याची मुभा आहे.

डॉ. मधुप मोहता
निवृत्त अधिकारी,
भारतीय परराष्ट्र सेवा
भारतीय माध्यमे आणि नेपाळ यांच्यामध्ये सध्या ‘कालापानी’वरून बरीच चर्चा सुरू आहे; पण चर्चा करणाऱ्यांना याची कल्पना नाही की, भारत-नेपाळ सीमा अन्य सीमांसारखी नाही. ती एक सचित्र व सतत बदलणारी सीमा आहे. एखादी नदी हिवाळ्यात गोठली व उन्हाळ्यात पुन्हा वाहू लागली की, ही सीमा त्यानुसार बदलते. पावसाळ्यात पूर आला की सीमा अनिश्चित असते. पूर ओसरल्यावर या १,८०० कि.मी. लांबीच्या सीमेवर जमिनींचे पट्टे अनेकांकडून बेकायदा बळकावले जातात. प्रत्येक पावसाळ्यानंतर जमीन बळकावण्याचे स्वरूप व व्याप्ती बदलत असते. सुमारे ६,००० नद्या, नाले व ओढे नेपाळमधून भारतात वाहत येतात व त्यांना दरवर्षी येणाºया पुरांनी सीमेचे गणित बदलत असते. सीमेवर उभे केलेले खुणेचे खांब बदलत्या हवामानात टिकत नाहीत व सीमाभागांमध्ये राहणाऱ्यांनाही त्यांची फिकीर नसते. नेपाळ-भारतदरम्यानची सीमा दिल्ली व काठमांडूमधील सरकार नव्हेत, तर नद्या व सीमाप्रदेशात राहणारे लोक ठरवतात. सीमावाद व त्यावरील तोडग्याचे खरे मूळ यातच आहे.


नेपाळच्या डोंगराळ भागात राहणारे नागरिक हिवाळ्याच्या दिवसांत नदीपात्राच्या खालच्या पट्ट्यात स्थलांतर करतात. ते सीमेला लागून असलेल्या भारतातील पठारी प्रदेशामध्ये कामधंदा करतात. त्यांची कागदोपत्री कुठे नोंद नसते. नेपाळी लोकांना भारतात येऊन काम करण्याची आणि मालमत्ता करण्याची मुभा आहे.
प्रथेने तसा जणू कायदाच आहे. म्हणून तर प्रत्येक भारतीय शहरात नेपाळी लोक मालमत्तांचे मालक असल्याचे दिसतात. येथे येऊन कुठेही स्वैर संचार करता येत असल्याने त्यांच्यादृष्टीने सीमा निरर्थक आहे; पण हे फक्त नेपाळींसाठी एकतर्फी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे कालापानी भागात राहणाºयांना तेथे सीमा नेमकी कुठे आहे, याचे फारसे महत्त्व नाही. बुधी आणि गुंजी येथील वस्त्यांमध्ये वर्षाच्या बहुतांश दिवसांत कोणीच नसते. पूर्वी सुमारे ५० वर्षे मानसरोवर यात्रेमुळे तेथे वस्ती असायची; पण आता यात्रेची व्यवस्था कैलास मानसरोवर पर्यटन विकास निगमकडूनच केली जात असल्याने स्थानिकांना कामच उरलेले नाही.


आपण भौगोलिक नकाशावरील तपशीलाकडे
पाहू. सुगौली करारात काली नदीचा उल्लेख आहे.
त्या नदीला भारतात शारदा व नेपाळमध्ये महाकाली
असे म्हटले जाते. कालापाणीतून उगम पावणाºया जलस्रोतास ‘कालापानी’ म्हणतात. लोक त्या स्थळाला पवित्र मानतात. तेथे मंदिरही आहे. मानसरोवराला जाणारा प्रत्येक यात्रेकरू कालापानी येथे थांबतो आणि तेथील मंदिरात दानधर्म करतो. कालापानी येथील झºयांतूनच काली नदी उगम पावते, ही लोकांची श्रद्धा आहे. गंगोत्री येथील गोमुखातून गंगा उगम पावते या हिंदूंच्या श्रद्धेसारखेच हे आहे. खरंतर गोमुखातून भागीरथी नव्हे तर अलकनंदा उगम पावते. ‘कुंती यंक्ती हे काली नदीचे उगमस्थान आहे,’ या नेपाळच्या दाव्याला जलविज्ञान शास्त्राच्या दृष्टीने आधार आहे; पण लोक तसे मानत नाहीत व सुगौली करार ज्यांनी केला, तेही तसे मानणारे नव्हते म्हणूनच येथे सीमेचे कोणतेही खांब नाहीत. १९६१ च्या चीन व नेपाळ यांच्यातील सीमा करारात ज्याचा ‘सीमा खांब क्र. १’ असा उल्लेख आहे तो प्रत्यक्षात लिंपियाधुरा येथे नव्हे, तर काली व तिनकर यांच्या मधे आहे. उलट भारत आणि तिबेट यांच्यादरम्यानचा व्यापार लिपुलेखमार्गे होतो. पूर्वीपासून भारत आणि तिबेट यांच्यात झालेल्या करारांत लोक आणि माल वाहतुकीचे केंद्र म्हणून लिपुलेखचाच उल्लेख आढळतो.
हीच पूर्वापार चालत आलेली प्रथा नेपाळ व भारत यांच्यातील आपसांतील समजुतींमध्ये रुजलेली दिसते. याचे मुख्य कारण असे की, नकाशात कालापानी भारताच्या हद्दीत दाखविले असले तरी त्याने नेपाळींना मज्जाव होत नाही. ते दोºयाचे पूल ओलांडून भारतीय बाजूस येऊन काम करू व मालमत्ताही खरेदी करू शकतात. याच जमिनीचे अभिलेख पिठोरगढ जिल्ह्यांत असल्याने केल्या जाणाºया जमिनींच्या खरेदीची नोंद उत्तराखंड सरकार करते व जमीन महसूलासह अन्य करही तेच सरकार गोळा करत असते.


‘हिमालयीन गॅझेटियर्स’मध्ये ज्यांचा आधार घेतला, अशा स्कंदपुराणासह प्रत्येक पौराणिक ग्रंथांमध्ये ओम पर्वत व आदी कैलास ही भारतीय संस्कृतीची मुख्य केंद्रे मानली आहेत. मानसरोवर ‘नो मॅन्स लँड’ राहिलेले नाही, ही बाब समकालीन तिबेटमध्ये आर्थिक व सामाजिक कलहाचे कारण ठरले आहे. हिंदू, जैन व शिख यात्रेकरूंना ओम पर्वतापासून दूर ठेवण्याचा विचार प्रश्न सोडविण्याऐवजी अधिक समस्या निर्माण करेल, हे या भागात शासन केलेल्या ब्रिटिश, तिबेटी व चिनी सरकारसह प्रत्येक सरकारने पक्के ओळखले आहे. नेपाळातील सध्याच्या सत्ताधाºयांनीही याची जाणीव ठेवायला हवी. १८४१ मधील झोरावर सिंग कहलुरिया यांच्या स्वाºयांनी हीच गोष्ट अधोरेखित होते.


एडविन टी. अटकिन्सन यांनी संपादित केलेल्या ‘हिमालयीन गॅझेटियर्सच्या पाचव्या प्रकरणात कुमाऊं टेकड्यांच्या परिसराचा इतिहास, भूगोल आणि वंशशास्त्रीय संबंध नोंदविलेला आहे. त्यावरून असे स्पष्ट होते की, १८१७ मध्ये ब्यान्सचे विभाजन करून हद्द ठरविताना सुगौली करारातील कलमांचा अर्थ लावण्यावरून वाद झाला होता. कालापानी येथून उगम पावणाºया छोट्या झºयालाच लोक काली नदीचे उगमस्थान मानतात, हे दोतीचे त्यावेळचे गव्हर्नर बाम साह यांना कॅप्टन वेब यांनी पटवून दिले होते. ४ फेब्रुवारी १८१७ ते १० आॅक्टोबर १८१७ या काळात नेपाळमधील पहिले ब्रिटिश रेसिडेंट गार्डिनर आणि नेपाळचा राजदरबार यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारांतही या नोंदी आढळतात.