शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

माझं वय झालंय.. मला मृत्युपत्र करायचं आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:03 IST

स्वकमाईची आणि स्वत:च्या मालकीची, स्वत: खरेदी केलेली मालमत्ता आपल्या हयातीनंतर योग्य व्यक्तीच्या हाती पडावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी मृत्युपत्र करणं हा सर्वांत सुरक्षित आणि चांगला मार्ग आहे. ही मालमत्ता तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे कोणालाही देऊ शकता. मृत्युपत्र जर केलेले नसेल तर मात्र मृत्यूनंतर ही मालमत्ता वारसांना वारसाहक्कानं मिळते.

माझं वय ८० वर्षे आहे. माझी स्वकमाईची मालमत्ता मला माझ्या जवळच्या काही जणांना द्यायची आहे..         - अनामिक, धुळेस्वकमाईची आणि स्वत:च्या मालकीची, स्वत: खरेदी केलेली मालमत्ता आपल्या हयातीनंतर योग्य व्यक्तीच्या हाती पडावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी मृत्युपत्र करणं हा सर्वांत सुरक्षित आणि चांगला मार्ग आहे. ही मालमत्ता तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे कोणालाही देऊ शकता. मृत्युपत्र जर केलेले नसेल तर मात्र मृत्यूनंतर ही मालमत्ता वारसांना वारसाहक्कानं मिळते.आपल्या मृत्यूनंतर आपली मालमत्ता, संपत्ती किंवा हक्क कोणाला आणि कशा प्रकारे द्यायचे यासंदर्भात मृत्युपत्र तयार केलं तर ते अधिक श्रेयस्कर असतं. महाराष्ट्रात मृत्युपत्राची नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक नाही, पण नोंदणी केलेली असली तर भविष्यात वाद निर्माण झाल्यास मृत्युपत्र हा अधिक विश्वसनीय पुरावा ठरतो.  

मृत्युपत्र तयार करणाऱ्यानं आपलं पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मालमत्तेचं स्पष्ट वर्णन लिहावं. कोणत्या व्यक्तीला कोणती मालमत्ता द्यायची हे त्यात स्पष्टपणे नमूद करावं. मृत्युपत्र लिहिल्यानंतर दोन प्रौढ साक्षीदारांनी त्यावर सही करणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही आपली मालमत्ता देणार आहात, म्हणजे मालमत्तेचा लाभ घेणारेच साक्षीदार नसावेत. सोबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र असल्यास उत्तम. संबंधित उपनोंदणी कार्यालयात (सब रजिस्ट्रार ऑफिस) मूळ मृत्युपत्र, ओळखपत्र, दोन साक्षीदारांच्या सह्या आणि काही प्रमाणात नोंदणी शुल्क भरल्यानंतर मृत्युपत्र नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. मृत्युपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीला आपल्या हयातीत ते कधीही, कितीही वेळा बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असतो. शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. अट एकच, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र