शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

निवडणुका आणि संगणकीय तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 4:51 AM

लोकसभा व विधानसभेच्या आता कदाचित एकत्र निवडणुका वर्षअखेर जाहीर होतील. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत.

- डॉ. दीपक शिकारपूर ( संगणक तज्ज्ञ)लोकसभा व विधानसभेच्या आता कदाचित एकत्र निवडणुका वर्षअखेर जाहीर होतील. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. आधुनिक तंत्राचा वापर आता वैयक्तिक व व्यावसायिक स्तरावर होत असल्याने निवडणूक त्याला कशी अपवाद ठरेल. आपल्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत संसद, विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था असे तीन स्तर आहेत. मतदान यादी, प्रत्यक्ष मतदानापासून विजयी उमेदवाराबाबतचे अंदाज वर्तविण्यापर्यंतच्या अनेक पैलूंमध्ये हे तंत्रज्ञान समाविष्ट झालेले आढळते.मतदारांना निवडणुकीसंदर्भातील सुविधा आणि माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी ट्रू वोटर नावाचे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र सहजपणे शोधता येते. उमेदवारांनी शपथपत्राद्वारे भरलेली माहिती पाहता येते. उमेदवारांना या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक खर्च सादर करता येतो. हे अ‍ॅप मुख्यत: नागरिक, मतदार, निवडणुकीशी संबंधित अधिकारी/कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे व राजकीय विश्लेषक यांना उपयोगी ठरणार आहे. या अ‍ॅपचे मुख्य कार्य, मतदारांना यादीतील नावाचा शोध उपलब्ध करून देणेआहे.आता महत्त्वाचे पाऊल म्हणजे मतदानाचे. मतदान करण्यापासूनच सुरुवात करू, इव्हीएम उर्फ इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत आरंभी बऱ्याच शंका व्यक्त झाल्या व आपल्याकडील अशिक्षित आणि अर्धशिक्षितांना हे तंत्र जमेल काय, अशी विचारणा झाली, परंतु सुरुवातीपासून इव्हीएमच वापरत असल्याप्रमाणे लोक सराईतपणे मतदान करताना दिसतात! या वेळी नोटा (NOTA) म्हणजेच नन आॅफ द अबॉव्ह या बटनाचीच चर्चा जास्त आहे! मतमोजणीदेखील अतिशय वेगाने, अचूकतेने आणि गैरप्रकार होऊ न देता करणे इलेक्ट्रॉनिक तंत्रांमुळे शक्य झाले आहे.सर्वच उमेदवारांच्या मतदानाआधीच्या प्रचाराची धामधूम आता सोशल मीडियामुळे चांगलीच बदलली आहे! उमेदवाराची प्रतिमा, त्याने केलेली विधाने अशांसारख्या बाबींना एफबी आणि टिष्ट्वटरवर जास्तीतजास्त लाइक्स आणि शेअरिंग मिळविणे हे प्रत्यक्ष मिरवणुका, पोस्टर्स आणि हॅँडबिलांइतकेच किंवा त्यांपेक्षाही महत्त्वाचे मानले गेले आहे!! स्मार्ट फोन आणि इतर तंत्रांच्या प्रसाराच्या विलक्षण वेगामुळे हे शक्य झाले आहे़ अगदी गेल्या निवडणुकीतही सोशल मीडियाची इतकी हवा नव्हती.|निवडणुकांमध्ये गैरप्रकार होणे आपल्याकडे नवीन नाही, परंतु त्यांची खबर, चित्रफितीच्या रूपातील पुराव्यासहित! - तत्काळ संबंधितांपर्यंत पोहोचविणे आता स्मार्ट फ ोन आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या इंटरनेटमुळे शक्य झाले आहे. याला साधारणत: स्टिंग आॅपरेशन असे म्हटले जाते. मतदानाआधी आणि निकालापूर्वीच्या दिवसांत टीव्हीवरून अंदाज वर्तविण्याला अगदी जोर येतो. या कल-चाचण्या (ओपिनियन पोल्स) मतदारांना प्रभावित करू शकतात का? हे अंदाज खरे आणि भरवशाचे असतात की फुगवलेले आणि फेरफार केलेले? त्यावर बंदी घालावी का? इ. मुद्द्यांची चर्चा, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून, आपापल्या सोईनुसार, सतत घडविली जाताना आपण पाहतोच, तसेच आॅनलाइन सॅँपलिंग पद्धतीनेही मतदारांच्या मनाचा कल, त्यांना भावणारे आणि खुपणारे मुद्दे अशा बाबींचे चित्र मिळविता येते.

टॅग्स :Electionनिवडणूक