शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

‘भाजीपोळीपंचटार्गेट’; ‘होतं तेच बरं होतं’ असं म्हणण्याची वेळ येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:12 AM

‘वर्क फ्रॉम होम’ने गांजलेल्या चाकरमान्यांच्या अस्वस्थ कहाण्या

नऊ ते पाच हे रुटीन जगभरातल्या माणसांना किती ‘बोअर’ वाटत होतं. ‘आपल्या आयुष्यात काहीतरी भन्नाट घडावं आणि बदलून जावं आयुष्य, कंटाळा आला या नुसत्या कोरड्या कोरड्या ‘भाजीपोळीपंचटार्गेट’ जगण्याचा!’ अशी एक सर्वदूर भावना होती. ज्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवलत आहे, ज्या लोकांना फ्लेक्झी अवर्समध्ये काम करता येतं, जे फ्री लान्सर आहेत, त्यांचं आयुष्य म्हणजे हेवा वाटावा अशी ‘लक्झरी’ होती बाकीच्यांसाठी.

कोरोनाच्या संसर्गभयाने हे चित्रच पालटून टाकलं.

घरी बसून काम करण्याचा’ स्वप्नवत वाटणारा पर्याय अनेक कर्मचाऱ्यांना अचानकच मिळाला. सुरुवातीला सोयच सोय म्हणून सरसकट खुशी होती. कोरोनाच्या हल्ल्याने हैराण झालेल्यांना आपल्या वाट्याला आलेल्या वास्तवाचा मुकाट स्वीकार करण्यावाचून पर्यायही नव्हता.हळूहळू ‘वर्क फ्रॉम होम’चं पहिलेपण संपलं. मग तक्रारी सुरू झाल्या.

काहींनी अडचणीतून शिताफीने मार्ग शोधले आणि आपण आता ‘वर्क फ्रॉम होम’चे कट्टर पुरस्कर्ते झाल्याचंही जाहीर केलं. पर्यावरणाच्या अभ्यासकांना या पर्यायात ‘संकटातली संधी’ दिसली. पण आता जवळपास दोन महिने उलटून गेल्यावर मात्र जगभरच्या ‘रिमोट वर्किंग’ नोकरदारांमधून नाराजीचे, नकोसेपणाचे स्वरही ऐकू येऊ लागले आहेत.

या ‘न्यू नॉर्मल’ होऊ घातलेल्या व्यवस्थेतल्या अडचणी आणि छुपे प्रश्नही आता समोर येऊ लागले आहेत. चतकोराएवढ्या घरात कोंडून घेऊन, कामाची जागा-वीज-इंटरनेट अशा अडचणींचे डोंगर ओलांडत ओलांडत सहकाऱ्यांच्या संपर्काविना एकाकी, एकेकट्या कामाच्या ताणाने अनेकांना आता सैरभैर करून सोडलं आहे.

जगभरात अभ्यास, सर्वेक्षणं करून निष्कर्ष प्रसिद्ध केले जात आहेत. त्यांपैकी काही अभ्यासकांना असं दिसतं/वाटतं की, मनाविरुद्ध ‘वर्कफ्रॉम होम’ करीत असलेली माणसं आजच रडकुंडीला आलेली आहेत. आपण एखाद्या ‘पिंजºयात’ अडकलो आहोत आणि यातून कधीच सुटका होणार नाही, अशी बहुसंख्यांची भावना होत चालली आहे. मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. वेगवेगळ्या मदत-वाहिन्यांवर विचारल्या जाणाºया प्रश्नांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ करावं लागणाºयांच्या दुखण्याची आता भर पडत चाललीआहे.

रिमोट वर्किंगची पहिली संधी मिळताच आधी ज्यांना आनंद झाला होता, त्यातले काही आता ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ असं म्हणू लागले आहेत. काल या स्तंभामध्ये आपण ‘वर्क फ्रॉम होम’च्या फायद्यांची चर्चा केली होती, आज त्याच नाण्याची ही दुसरी; पण तोट्यांची बाजू तपासून पाहूया!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHomeघर