शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - ‘कॅशलेस’चे गुंते

By admin | Updated: January 10, 2017 00:28 IST

रोखीतील व्यवहार कमी करुन देशातील जनतेने ‘प्लॅस्टिक मनी’चा वा ‘नेट बँकींग’चा सढळ वापर कारावा आणि संपूर्ण देश ‘कॅशलेस’ व्हावा हा भले मोदी सरकारचा हेतू असला

 रोखीतील व्यवहार कमी करुन देशातील जनतेने ‘प्लॅस्टिक मनी’चा वा ‘नेट बँकींग’चा सढळ वापर कारावा आणि संपूर्ण देश ‘कॅशलेस’ व्हावा हा भले मोदी सरकारचा हेतू असला व तो पूर्णांशाने साध्य होऊ शकत नाही याची सरकारलाही पूर्ण जाणीव असली तरी जनतेने इच्छेने वा अनिच्छेने हा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने गेले दोन महिने पद्धतशीर प्रयत्नही केले आहेत. परंतु जनता आणि सरकारचा हेतू यांच्या दरम्यान बँका व विशेषत: खासगी बँका जी नाठाळपणाची भिंत उभी करु पाहात आहेत त्याबाबत सरकार हतबल असावे असे दिसते. आॅनलाईन पद्धतीने गॅस सिलींडरचे पैसे भरल्यास सरकार पाच रुपयांची सूट देणार तर बँका सहा ते सात रुपये आकारुन मोकळ्या होणार. तोच प्रकार पेट्रोल वा डिझेलचा. प्लॅस्टिक मनीचा वापर केल्यास सरकार शंभर रुपयांमागे ७५ पैशांची सवलत देणार तर खासगी बँका पंप चालकाकडून एक टक्का म्हणजे एक रुपयाचा अधिभार वसूल करणार. परिणामी पंप चालकांनी प्लॅस्टिक मनी स्वीकारणारच नाही अशी भूमिका घेतली तर त्यांचे चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. तूर्तास हे टळले असले तरी या खासगी बँका पुन्हा डोके वर काढणारच नाहीत असे नव्हे. तसे झाले की मग कॅशलेस सोसायटीचे काय होणार हे सांगण्याची गरज नाही. पुन्हा असे व्यवहार सध्या केवळ महानगरे, शहरे आणि काही निमशहरे यांच्यापुरतेच मर्र्यादित आहे. ग्रामीण भागापर्यंत तर याचे वारेही पोहोचलेले नाही. एटीएममधून मिळणाऱ्या रकमवेर (मिळालीच तर) अजूनही रेशनींग असताना एटीएमच्या विनाशुल्क मर्यादेहून अधिकच्या वापरावर आकारले जाणारे व मध्यंतरी स्थागित ठेवलेले शुल्क बँकांनी गुपचूप पुन्हा सुरुदेखील करुन टाकले आहे. पण रिझर्व्ह बँकेने त्याची दखल घेतलेली नाही. थोडक्यात रोकडरहित समाजासाठी आज जे काही पर्याय जनतेला उपलब्ध आहेत व ज्यांचा मर्यादित शहरांमध्ये का होईना मोठ्या प्रमाणावर वापर सुरु झाला आहे त्याच्यातच अडचणी येत असताना व काही बँका त्या जाणीवपूर्वक निर्माण करीत असताना येत्या अवघ्या चार वर्षात रोकडरहित व्यवहाराची आज प्रचलित असलेली सर्व साधने कालबाह्य ठरतील आणि केवळ बोटांच्या ठशांनी सारे व्यवहार सुरु होतील असा विश्वास निती आयोगाने व्यक्त केला आहे. सामान्यत: आजच्या जमान्यात समाज नीती-अनितीशी जसा फटकून वागतो तसाच हा निती आयोगदेखील समाजाशी फटकून वागत असावा असे दिसते. निवृत्ती वेतनधारकास वर्षातून एकदा सादर करावयाचे जीवित प्रमाणपत्र यंदाच्या वर्षापासून आॅनलाईन पद्धतीने जमा करण्याची पद्धत सुरु झाली आहे व त्यासाठी आधारभूत मानले जातात ते आधार कार्ड काढताना दिले गेलेले बोटांचे ठसे. पण वार्धक्य आणि श्रमाची कामे यामुळे ठशांवरही परिणाम होत असतो व त्यापायी अडचणी निर्माण होतात. या आणि अशा व्यावहारिक अडचणींचा विचार जर होणार नसेल तर कार्डलेस काय किंवा कॅशलेस काय, यांचे अस्तित्व केवळ तात्विक चर्चेपुरतेच मर्यादित राहील.