शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळातील शहाणपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 04:47 IST

इस्रायलमधील पेट्रोलपंपांवर गर्दी झाल्याची एकही बातमी नाही. दुसरीकडे भारत युद्धात नाही; पण एका व्हॉट्सॲप संदेशाने लाखो लोकांना रांगेत उभे केले. हा फरक लाजिरवाणा आणि आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा आहे.

मध्य-पूर्व आशियातील युद्ध कोणते वळण घेणार हे अनिश्चित असताना, भारत सरकारने दि. २६ मार्चला रात्री उशिरा एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करून, पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त अबकारी कर प्रतिलिटर १३ रुपयांवरून ३ रुपयांवर आणला, तर डिझेलवरील दहा रुपयांचा कर पूर्णपणे रद्द केला. देशात टाळेबंदी (लॉकडाऊन) होणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. 

अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाने होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत केल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर सुमारे ५० टक्क्यांनी वाढले आहेत. इंडियन ऑइल, भारतपेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील तीन्ही कंपन्या वाढीव दराने खनिज तेल विकत घेत आहेत; परंतु सरकारी धोरणानुसार किरकोळ विक्री दर मात्र जुन्या पातळीवरच आहेत. म्हणजेच कंपन्या प्रत्यक्षात तोट्यात इंधने विकत आहेत. अशा परिस्थितीत अबकारी कर कमी करून सरकारने इंधन कंपन्यांना प्रत्यक्ष आणि ग्राहकांना अप्रत्यक्ष दिलासा दिला आहे. 

खनिज तेल दरवाढीमुळे कंपन्यांना दरवाढ करणे अपरिहार्य झाले होते. आता त्या दरवाढीची तीव्रता ग्राहकापर्यंत पोहोचणार नाही. अबकारी कर कमी केला नसता, तर इतर अनेक देशांप्रमाणे भारतातही इंधन दरवाढ अपरिहार्य होती; परंतु सरकारने अबकारी कर कपात करून तो धक्का शोषून घेतला आहे. जगातील बहुतांश देशांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असताना, भारतात मात्र अद्याप तरी दरवाढ झालेली नाही. नागरिकांना दरवाढीपासून संरक्षण देणे हे भारत सरकारचे निश्चितच मोठे यश आहे. अर्थात, आगामी विधानसभा निवडणुका पार पडल्यावरही युद्धजन्य स्थिती कायमच राहिल्यास, भारतातही इंधन दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान एक वेगळाच गोंधळ देशात माजला आहे. 

पंतप्रधानांनी युद्धासंदर्भात संसदेत भाष्य करताना, ‘सज्ज राहायला हवे, एकत्र राहायला हवे’ अशा आशयाचे आवाहन केले. ते नागरिकांना एकजुटीचे आवाहन होते; मात्र पंतप्रधानांच्या ‘कोविडसारखी तयारी’ या शब्दांनी टाळेबंदी येतेय, अशी आवई समाजमाध्यमांमध्ये उठली. त्यातच २४ मार्चला ‘कोविड लॉकडाऊन’ला सहा वर्षे पूर्ण झाल्याने, भीतीला एक स्मृतिजन्य आधार मिळाला होता. या पार्श्वभूमीवर, टाळेबंदीचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण भारत सरकारने केले; परंतु तोपर्यंत अफवेने आपले काम केले होते. वाणिज्यिक द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) सिलिंडरचे वितरण बंद केल्याने घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी रांगा लागल्या होत्याच; टाळेबंदीच्या अफवेमुळे त्या पेट्रोलपंपांवरही लागल्या. सरकारने स्पष्ट केले, की देशात ६० दिवसांचा इंधन साठा आहे, तुटवडा नाही. तरीही रांगा कमी होताना दिसत नाहीत. अफवांनी निर्माण केलेल्या मागणीमुळे काही ठिकाणी तर पेट्रोलपंप खरोखरच कोरडे पडले! 

एवढे सरकारी खुलासे होऊनही लोक अफवांना का बळी पडतात? याचे उत्तर केवळ निरक्षरता किंवा अज्ञानात नाही. कोविड काळातील टाळेबंदी, त्यापूर्वीची नोटबंदी यांच्या आठवणी सामान्य माणसाच्या मनात खोलवर रुतून बसल्या आहेत. संकटकाळी सरकार काही तरी लपवते आणि अचानक निर्णयच जाहीर करते, असा एक सामाजिक अनुभव तयार झाला आहे. हीच मानसिकता समाजमध्यमांमधील अफवांना सुपीक जमीन पुरवते. जबाबदार नागरिकत्वाची खरी परीक्षा माहिती पुढे पाठविण्यापूर्वी ती तपासण्यात आहे. दुर्दैवाने इथेच आम्ही भारतीय अजूनही मागे आहोत. इस्रायल प्रत्यक्ष युद्धाच्या आगीत होरपळत आहे. तिथे रोजच क्षेपणास्त्रे पडतात; पण नागरिक त्यांचे सामान्य आयुष्य जगतात. हल्ल्याची सूचना देणारा सायरन वाजला, की अजिबात गोंधळ न  घालता आपत्कालीन आश्रयस्थानी जातात आणि सर्व काही ठीक असल्याचा सायरन वाजताच, आपापल्या कामांना लागतात, जणू काही झालेच नाही ! 

इस्रायलमधील पेट्रोलपंपांवर गर्दी झाल्याची एकही बातमी नाही. दुसरीकडे भारत युद्धात नाही; पण एका व्हॉट्सॲप संदेशाने लाखो लोकांना रांगेत उभे केले. हा फरक लाजिरवाणा आणि आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा आहे. अबकारी कपात आणि टाळेबंदी नाकारणे या दोन्ही घोषणा ही योग्य दिशेने टाकलेली पावले आहेत. संकटकाळात सामान्य माणसाच्या खिशावरचा भार कमी करणे हे शासनाचे कर्तव्यच  आहे आणि ते पार पाडले जात आहे; परंतु या निर्णयांना नागरिकांच्या विवेकाची साथ मिळाली नाही, तर त्यांचा परिणाम मर्यादित राहतो. प्रगल्भ नागरी समाज म्हणजे केवळ सुशिक्षित समाज नव्हे ! प्रगल्भ समाज संकटकाळी शांत राहतो, माहिती तपासतो, साठेबाजी टाळतो आणि सामूहिक हिताचा विचार करतो. ती प्रगल्भता आपल्याला अजून गाठायची आहे, हेच खरे !
 

English
हिंदी सारांश
Web Title : Wisdom in Crisis: Fuel Tax Cuts and Lockdown Rumors in India

Web Summary : Amidst global uncertainty, India cut fuel taxes, denying lockdown rumors. Panic buying ensued, fueled by misinformation. The government assures sufficient fuel reserves. Citizens need responsible information verification, learning from Israel's calm crisis response.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडरPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल