शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:18 IST

अक्षय्य तृतीया हा सण खान्देशात आखाजी म्हणून ओळखला जातो. हा सण सासुरवाशिणींच्या अधिक जिव्हाळ्याचा... माहेराची सय जागी करणारा आखाजी लोकलयींमधून आपल्याला भेटत असतो.

दुर्गेश सोनारसहायक संपादक चैत्र सरतो आणि वैशाखाच्या तळपत्या उन्हाने धरती करपू लागते. धुळीने माखलेल्या पायवाटा, आटलेल्या विहिरी, विरळ सावल्या... अशा दिवसांत आखाजी येतो आणि कोरड्या ऋतूलाही आनंदाचा ओलावा लाभतो. अक्षय्य तृतीया अर्थात खान्देशातला आखाजी हा नात्यांची वीण घट्ट करणारा सण. सासुरवाशिणींसाठी तर तो काळजात जपलेला दिवस. आखाजी जवळ आला की माहेरची ओढ उसळते आणि त्यातून जन्म घेतात आखाजीची अक्षय गाणी.

अहिराणी बोलीतील ही गाणी कुण्या कवीने लिहिलेल्या कविता नाहीत; जात्यावर दळताना, विहिरीवर पाणी शेंदताना, झोक्यावर झुलताना सहज ओठांवर आलेल्या कहाण्या आहेत. म्हणूनच त्यात कृत्रिमता नाही; तर जगण्यातून आलेला थेट तरल स्पर्श आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी यायला मिळते. दिवाळी घाईत निघून जाते; पण आखाजीला विसाव्याचे काही क्षण असतात. म्हणूनच त्यांच्या नजरा माहेरच्या वाटेकडे लागलेल्या असतात -

“आखाजी आली माय, धाडजो कोनी घेवा,डोळाभर वाट पाहूं, उंबरठा टेकवा...”

या दोन ओळींत स्त्रीमनाची व्याकुळता दडलेली आहे. माहेर म्हणजे केवळ घर नव्हे; ती आपलेपणाची सावली असते.आखाजीच्या गाण्यांत भाऊ-बहिणीच्या नात्याचा विलक्षण जिव्हाळा आहे. भाऊ म्हणजे माहेराचा चालता-बोलता दुवा - 

“भाऊ मन्हा येईल रं, धूळ उठी वाटे,आखाजीच्या दिसी, जीव धडधडी छाते...”

माहेरच्या ओढीने ती भावाबरोबर निघते तेव्हा वैशाखाचे ऊन अंग भाजत असते, अशावेळी वाटेतील कन्हेरीची सावली तिला दिलासा देते.

“चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय, वैशाखाचं उन्हंखडक तापुन लाल झाले वं माय, तापुन झाले लालआईच्या पायी आले फोड वं माय, पायी आले फोडआईची बेगडी वाव्हन वं माय, बेगडी वाव्हनतठे काय कन्हेरानं झाड वं माय, कन्हेरानं झाड...”

सणाला आमरस, पुरणपोळीचा बेत असतो. झाडांना झोके बांधले जातात. मैत्रिणी भेटतात, हास्याचे मोहोळ उठते आणि आपसूकच गाणे ओठांवर येते -

“आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं,कैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वं...”

या गीतांत आनंदाचाही ताल आहे आणि श्रम विसरून जगण्याची मुक्तताही. अहिराणी बोलीचे माधुर्य या गीतांतून खुलते. “मन्हा”, “धाडजो”, “मायेर”, “दिसी” असे शब्द केवळ शब्द राहत नाहीत; ते संपूर्ण प्रदेशाची लज्जत घेऊन येतात. भाषा शब्दकोशात नसते, ती लोकांच्या जगण्यात असते, याचा प्रत्यय ही गाणी देतात. आखाजीची गाणी म्हणजे खान्देशातील स्त्रियांचे मौखिक आत्मचरित्रच. ज्यांना लिहिण्याची संधी नव्हती, त्यांनी गाण्यांतून व्यथा, प्रेम, स्मृती आणि आनंद जपून ठेवला. आखाजी दरवर्षी येतो, जातो; पण या गीतांत जपलेला माहेराचा ओलावा कायम अक्षय राहतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshaya Tritiya: Songs of enduring love and longing for maternal home.

Web Summary : Akshaya Tritiya in Khandesh strengthens bonds, especially for married women longing for their maternal home. Ahirani songs reflect this yearning, expressing love, memories, and joy. These oral histories preserve the enduring essence of 'maher' (maternal home).
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया