शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

Air Pollution Effects: हवेतल्या सिगारेटींनी भरतोय आपण छाती, मुंबई-पुण्यातील हवा किती घातक, माहितेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:19 IST

मुद्द्याची गोष्ट : हवा एवढी खराब झाली आहे की आपण रोज सिगारेट ओढल्यासारखे प्रदूषण छातीत भरत चाललो आहोत. त्यातून कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. हवाप्रदूषणाविरुद्धची लढाई म्हणजे फक्त पर्यावरण वाचविण्याची लढाई नाही, ती आपल्या फुप्फुसांचे आणि आपल्या पुढील पिढीच्या आरोग्याचे रक्षण करण्याची लढाई आहे. आज उचललेली छोटी पावले उद्याचा मोठा आजार टाळू शकतात.

- डॉ. स्वप्निल सतीश कुलकर्णी (श्वसनविकार तज्ज्ञ, पुणे)आज आपण श्वास घेतो ती हवा आधीपेक्षा आजास्त धोकादायक झाली आहे. धूळकण, वाहनांचे धुराचे उत्सर्जन, औद्योगिक वायू, बांधकामातील धूळ, तसेच घरातील प्रदूषण हे सर्व एकत्र येऊन आपल्या फुप्फुसांवर सतत आणि शांतपणे आघात करतात. अनेक वर्षांच्या अनुभवातून आणि विविध संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की वायू प्रदूषण केवळ दम्यासारख्या आजारांना कारणीभूत नसून फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका देखील लक्षणीय वाढवते.

आपल्या शहरांमध्ये पीएम २.५ आणि पीएम १० हे सूक्ष्म कण अत्यंत जास्त प्रमाणात आढळतात. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते थेट फुप्फुसांच्या आत खोलवर जाऊन फुप्फुसांवर सूज, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दीर्घकालीन पेशींमध्ये बदल निर्माण करतात. पीएम २.५ कण रक्तातसुद्धा प्रवेश करू शकतात व त्यामुळे शरीरभर परिणाम दिसू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने आणि आयएआरसीने वायू प्रदूषणाला 'ग्रुप १ कार्सिनोजेन' म्हणून मान्यता दिली आहे. म्हणजेच हे कर्करोग निर्माण करणारे घटक आहेत याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. भारतातील शहरांमध्ये नॉन-स्मोकर लोकांमध्ये वाढत असलेले फुप्फुसाचे कर्करोगाचे प्रमाण याच दिशेने इशारा करते. दीर्घकाळ प्रदूषित हवेचा संपर्क हा यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. धूम्रपान करणाऱ्यांसाठी तर हा धोका आणखी वाढतो कारण धूर आणि प्रदूषण यांचा संयुक्त परिणाम फुप्फुसांवर दुहेरी आघात करतो.

अनेक मोठ्या अभ्यासांनुसार, पीएम २.५ मध्ये प्रत्येक १० µg/m³ वाढ झाल्यास धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका १५-१९ टक्क्यांनी वाढतो. घरातील प्रदूषणही तितकेच धोकादायक आहे, लाकूड जाळून स्वयंपाक करणे किंवा घर गरम करणे, तसेच वर्षातून ३० पेक्षा जास्त दिवस घरात लाकूड जाळणे यामुळे कर्करोगाचा धोका जवळपास दुप्पट वाढतो. 

तेल अतिशय तापवून तळणे आणि हवेशीर नसलेले स्वयंपाकघरही हा धोका वाढवतात. काही देशांमध्ये झालेल्या अभ्यासात कोळसा वापरणाऱ्या ७० वर्षाखालील लोकांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोका १८-२० टक्के आढळला आहे.

कोण जास्त धोक्यात?

लहान मुले, वयोवृद्ध, हृदयविकार आणि श्वसनविकार असलेले रुग्ण, या सगळ्यांना प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसतो. सतत खोकला, श्वास लागणे, छातीत जडपणा ही लक्षणे दुर्लक्षित करणे घातक ठरू शकते.

इतर कर्करोगांचा धोका

खूप ताज्या संशोधनांनुसार हवेत असलेले सूक्ष्म कण, जड धातू व विविध रसायने फक्त फुप्फुसांपुरते मर्यादित न राहता इतर अवयवांवरही परिणाम करतात.

यामुळे मूत्राशय, स्तन, आतडी आणि रक्तातील काही कर्करोगांचा धोका वाढू शकतो, अशा संदर्भातील पुरावे वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय अभ्यासमालिका सध्या प्रदूषणाचा शरीरातील सूज (इंफ्लेमेशन), डीएनएमध्ये बदल व पेशींवरील दीर्घकालीन परिणामांचा बारकाईने अभ्यास करत आहे.

स्वतःचे संरक्षण

N95 मास्क नियमित वापरा, वाहनांचा वापर कमी करा आणि शक्य तितक्या वेळा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, वातावरणातील एक्यूआयवर लक्ष ठेवा, घरातील धुराच्या स्रोतांपासून दूर राहा, झाडे लावा आणि परिसर स्वच्छ ठेवा.

हवा म्हणजे 'अदृश्य सिगारेट'?

हे उदाहरण प्रदूषणाचा परिणाम समजून घेण्यासाठी उपयोगी आहे.एका सिगारेटमधून साधारण २२ µg/m³ पीएम २.५ तयार होते. सध्या मुंबईतील पीएम २.५ पातळी १५०-१७० µg/m³ आहे आणि पुण्याची पातळी साधारण ८०-१०० µg/m³ आहे. म्हणजेच १ सिगारेट = २२ µg/m³ पीएम २.५ इतके.

याचा अर्थ : दिवसभर अशा वातावरणात राहणे म्हणजे आपण रोज तेवढ्या सिगारेट्स अनैच्छिकरित्या ओढत आहोत, असा आपल्या शरीरावर परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्यांसाठी तर हा दुहेरी हल्ला ठरतो, पण धूम्रपान न करणाऱ्यांसाठी परिस्थिती आणखी चिंताजनक आहे, ते काहीही न करताही अनेक 'अदृश्य सिगारेट्स' ओढत असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Air pollution: Mumbai and Pune residents inhale invisible cigarettes daily.

Web Summary : Air pollution, especially PM2.5, poses significant health risks, including lung cancer, even for non-smokers. Mumbai and Pune residents are inhaling harmful levels equivalent to smoking multiple cigarettes daily. Protecting oneself with masks and reducing vehicle use is crucial.
टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणpollutionप्रदूषणHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यdoctorडॉक्टर