धुळे जिल्ह्यातील फागणे येथील धरणाच्या दुरूस्तीचे काम मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:36 AM2019-11-19T11:36:28+5:302019-11-19T11:36:49+5:30

काम न झाल्यास कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

Work on the repair work of the dam at Phagane in Dhule district | धुळे जिल्ह्यातील फागणे येथील धरणाच्या दुरूस्तीचे काम मार्गी लावा

धुळे जिल्ह्यातील फागणे येथील धरणाच्या दुरूस्तीचे काम मार्गी लावा

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे :तालुक्यातील फागणे येथील पाण्याची समस्या गंभीर आहे. पाणी टंचाई निवारणार्थ इंदिरानगर येथील लघुपाटबंधारे दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ते काम सध्या बंद आहे. येथील धरणाचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा मुख्य कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा फागणे परिसर संघर्ष व समन्वय समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फागणे गावाची पाण्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. उन्हाळ्यात दोन-तीन महिन्यात एकदा नळाला पाणी आले. तत्कालीन सरपंच विलास चौधरी व विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी फागणे गाव जलयुक्त शिवार योजनेत घ्यायला लावले. त्याअंतर्गत २०१८-१९ मध्ये ११ विविध कामे मंजूर झाली. त्यासाठी ७०-८० लाख मंजूर झाले. ही कामे एका एजन्सीला दिले आहेत. मात्र ते अद्याप झालेले नाही.
दोन-तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत इंदिरानगर येथील लघु पाटबंधारा दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी सहा लाख रूपये मंजूर आहेत. मात्र गावातील काही लोकांनी ते काम बंद पाडले आहे.
फागणे गावातील मोठे धरण हे १०० टक्के भरले आहे. सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. इंदिरानगरातील धरण त्वरित दुरूस्त झाले असते. तर गावाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असती.
परंतु विद्यमान सरपंच हे हेतुुपुरस्करपणे या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. याचेही काम थांबविण्यात आले आहे. हे काम दुसºया ठेकेदारास देण्यात यावे. धरणाच्या खालच्या बाजुला गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. धरणामुळे विहिरीमध्ये पाण्याचा साठा होऊन गावाची पाण्याची समस्या सुटू शकेल. वरील सर्व कामे २७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत झाले नाही, तर २८ नोव्हेंबर रोजी कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर विलास चौधरी, विक्रम सूर्यवंशी, वसंत पाटील, कैलास नाना पाटील, राजेश बडगुजर, भास्कर सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Work on the repair work of the dam at Phagane in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे