ट्रकखाली सापडून महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 21:20 IST2021-03-31T21:20:07+5:302021-03-31T21:20:32+5:30

बेटावद चौफुली : मयत महिला अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील

The woman was found under the truck and killed on the spot | ट्रकखाली सापडून महिला जागीच ठार

ट्रकखाली सापडून महिला जागीच ठार

धुळे : मोटरसायकलीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली. त्याच वेळेस तिच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने ती जागीच मरण पावली. अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी बेटावद चौफुलीवर घडली. अपघाताची नोंद मंगळवारी सायंकाळी नरडाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे राहणारे अविनाश गुलाब वानखेडे हे पत्नी प्रतिभाबाईंसह जीजे ०५ एचएम २७६४ या मोटरसायकलीने रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील बेटावद चौफुलीवरून जात असताना धुळ्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र.यूपी ८३ सीटी १४५६) त्यांच्या मोटरसायकलीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील मागे बसलेली प्रतिभाबाई ही रस्त्यावर फेकली गेली. त्याच वेळी ट्रकचे चाक तिच्या पोटावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. अपघातग्रस्त ट्रकसह चालक रामवीरसिंग लखनसिंग जाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयत महिलेचे पती अविनाश वानखेडे यांनी फिर्याद दिल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The woman was found under the truck and killed on the spot