शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयासमोर आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 22:44 IST

शेतकऱ्यांचा ईशारा : अक्कलपाडा पाटचाऱ्यांसाठी संपादीत जमिनींचा मोबदला त्वरित द्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यांतर्गत पाटचारींसाठी संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला मिळविण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकरी आजही प्रशासनाच्या पायºया झिजवत आहेत़ शासनाने तीन वर्षांपूर्वीच निधी दिला असून देखील भूसंपादन विभाग हेतुपूर्वक मोबदला देत नसल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे़अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाटचाºयांसाठी ज्ञानेश्वर माळी, प्रकाश भागवत, विजय जैन, बाळू सोनवणे यांच्यासह इतरही शेतकºयांच्या शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या आहेत़ शेतजमिनींचे योग्य मोजमाप करुन त्वरीत मोबदला द्यावा, अशी मागणी या शेतºयांनी गेल्या अनेक महिन्यांपासुन लावून धरली आहे़ परंतु या सामान्य शेतकºयांच्या मागण्या लाल फितीच्या कारभारात अडकल्या आहेत़ वेळोवेळी निवेदन देवून किंवा आंदोलन करुनही पुढील कार्यवाही होताना दिसत नाही़प्रकल्पबाधित शेतकºयांनी १० जून २०१९ रोजी क्युमाईन क्लब जवळ एक दिवसीय उपोषण केले होते़ त्यावेळी तत्कालीन उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य सुरेखा चव्हाण यांनी भूसंपादन प्रस्तावांची तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते़ तसेच भूसंपादन अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार प्रस्तावांवर कार्यवाही करण्याचा कालावधी दोन वर्षांचा असला तरी विहित कार्यपध्दती पुर्ण करुन त्वरीत निवाडे पुर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले होते़ त्यामुळे उपोषण मागे घेतले होते़प्रकल्पबाधित शेतकºयांच्या उपोषणाला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून या शेतकºयांनी ५ फेब्रुवारीला पुन्हा निवेदन दिले होते़ वारंवार पाठपुरावा करुन देखील प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही़ डावा कालवा अंतर्गत केलेल्या पाटचाºयांसाठी संपादीत केलेल्या जमिनींचा निधी शासनाने दोन ते तीन वर्षांपासुन उपलब्ध करुन दिला आहे़ परंतु मोबदला देण्यात प्रशासनाकडून हेतुपूर्वक विलंब होत आहे, असा आरोप निवेदनात केला आहे़दरम्यान, मंगळवारी सर्व शेतकºयांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली भूसंपादनचे उप जिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांची भेट घेवून चर्चा केली़ त्वरीत मोबदला मिळाला नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे़शेतकºयांची समजूत काढताना उप जिल्हाधिकारी भामरे म्हणाले की, संपादीत झालेल्या जमिनींची मोजणी करण्यासाठी यंत्र उपलब्ध झाले आहे़ मोजणी केल्यानंतर शेतकºयांशी चर्चा करुन समन्वयाने हा प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील़मंगळवारी प्रकल्पबाधित महिला पुरूष शेतकºयांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चांगलीच गर्दी होती़

टॅग्स :Dhuleधुळे