शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिथे मी कमी पडतो तिथे ती मला खंबीर साथ देते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:39 IST

कलेची किंमत फक्त एक रूपयाच असते

चंद्रकांत सोनार । देव जरी जगात नसला तरी देवासारखी माणसं जगात आहेत़ हे मी दुष्टीहीन असुन देखील अनुभवले आहे़ अंधशाळेत दहावीपर्यत शिक्षण घेतले़ सरकारकडून कोणतीही मदत नसतांना देखील बासरी वाजवुन कला प्रेमीच्या मदतीतुन संसार सुरू आहे़ प्रश्न : लग्न, नोकरी किंवा प्रेमविरहात आत्महत्या करणाºया तरूणांना आपन काय सांगाल?उत्तर :  संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त करता येवु शकत नाही़ नैराश्य, अपयश, पे्रमविरहात तरूण आत्महत्या करून जीवन संपवितात़ ना पैसा, ना म्हातारपणाची काठी, ना डोळ्यांची रोशनी नसतांना देखील आयुष्यात कधी खचलो नाही़ संघर्षातुन जीवन जगतो आहे़ आमच्यासारखे दु:ख कोणाच्याही वाट्याला निश्चित नसेल़ मग सर्व काही असतांनाही नैराश्यापोटी आत्महत्या करण्याची वेळच येवू नये़नशीबी अंधत्व असतांनाही जीवन जगण्याची प्रेरणा कशी मिळाली ?उत्तर : आयुष्य केवळ आमची परीक्षा घेण्यासाठी आहे़ म्हणुन संघर्ष करून  जिद्द व चिकाटीने जीवन जगतो आहे़  लग्न करतांना मुलगा मुलीला पसंत करतो़ मात्र मला मुलीने पसंत केले़ कारण मी जन्मता दोन्ही डोळ्यांनी अंध आहे़ आयुष्यात पत्नींची व कलेची साथ मिळाली म्हणुन गुण्यागोविंदाने संसार सुरू आहे़ आयुष्याचा साथीदार निवडणाºया तरूणींना आपण काय सल्ला द्याल ?उत्तर : गडगंज पैसा, पुणे, मुंबईत नोकरी, शेती असेल पण शेतात जाणार नाही़  या आधारावर मुली आयुष्याचा साथीदाराची निवड करतात़ बदलत्या काळानुसार तरूणींनी कुठेतरी तडजोड करण्याची गरज आहे़ प्रामाणिक, कष्टाळू तसेच संपत्ती कमविणाºयापेक्षा संपत्ती टिकविणाºया साथीदाराची निवड करावी़ तरच संसाराचा रथ आयुष्यभर चालु शकतो़ दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन कसा आहे? उत्तर : आम्ही फक्त कला सादर करून उदरनिर्वाह भागवतो़ समाजाने देखील दयेच्या भावनेने पाहण्याची गरज आहे़  

संसाररथाची दोन चाके  असतात़ ती चाके म्हणजे पती आणि पत्नी़ जर एक चाक लडखडू लागले की दुसºयांने त्याला आधार द्यायचा असतो़ मात्र आमच्या संसाराची दोन्ही चाके जन्मापासुनच कमकुवत आहेत़ त्यामुळे जिथे मी कमी पडतो तिथे ती मला साथ देते़ 

ती जास्त चालु शकत नाही आणि मी पाहू शकत नाही रोहिदास आणि गंगुबाई हे दिव्यांग दाम्पत्य आयु ष्याला घचुन न जाता़ बाररी वाजवुन संसाराचा गाढा चालवित आहे़ पती रोहिदास यांच्या डोळ्यातील ज्योती कायमच्या विझलेल्या आहेत़ तर पत्नी गंगुबाई या एका पायानी दिव्यांग आहे़ त्यामुळे त्या जास्त चाल शकत नाही़ बालपणापासुनच बासरी वाजविण्याचा छंद आता  रोहिदास आणि गंगुबाई यांच्या संसारासह त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे. क्षणिक सुखासाठी, किरकोळ कारणावरून काडीमोड घेणाºया पती-पत्नींसाठी त्यांचा हा आदर्श संसार निश्चितपणे प्रेरणादायी ठरावा, असाच आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे