प्रभाग क्र. ८ मध्ये विविध विकासकामांचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:11+5:302021-03-31T04:36:11+5:30

धुळे : महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये आजही विविध मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत ...

Ward no. 8 Include various development works | प्रभाग क्र. ८ मध्ये विविध विकासकामांचा समावेश करा

प्रभाग क्र. ८ मध्ये विविध विकासकामांचा समावेश करा

धुळे : महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये आजही विविध मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपाने प्रभाग आठमधील नागरिकांचे मूलभूत प्रश्न साेडवावेत, अशी मागणी लीना काटे यांनी केली आहे.

गल्ली नंबर १ ते ८ पर्यंत आणि जे. बी. रोड भागातील प्रमुख रस्ते व खोल गल्ली, गल्ली क्र. ४ पासून ते किसन बत्तीवाला चौकापावेतो बंदिस्त गटारी व्हाव्यात, अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. सदरची मागणी तातडीने पूर्ण करण्यात यावी, आवश्यक त्या भागात एलईडी पथदिवे बसविण्यात यावेत. तसेच गल्ली क्रमांक ४ व ५ चा बोळ, ५ व ६ चा बोळ या ठिकाणी आणि आग्रा रोड येथे जे. बी. रोड ते दुर्गा पाइपपावेतो गटारीची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मनपा या ठिकाणी पाहणी करून नागरिकांच्या समस्या साेडवाव्यात, अशी मागणी लीना काटे यांनी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Ward no. 8 Include various development works