शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी केंद्राला वाहनांचा गराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:06 IST

चिमठाणे-शिंदखेडा रस्ता बंद : बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल, प्रवाशी, वाहन चालक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : शिंदखेडा कापूस खरेदी केंद्रावर हजारो वाहनांची गर्दी झाल्याने चिमठाणे- शिंदखेडा रस्ता बंद झाला आहे. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसह प्रवासी, वाहन चालक त्रस्त झाले आहेत.खरेदी केंद्र बंद होण्याची वार्ताशिंदखेडा-चिमठाणे रस्त्यावर रेल्वे स्टेशनजवळील वर्धमान जिनिंगमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी केली जात आहे. तालुक्याला हे मध्यवर्ती व सोयीचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीस आणला जातो. त्यात २५ तारखेच्या रात्री संपूर्ण तालुक्यात कापूस खरेदी बंद होणार असल्याची वार्ता पसरल्याने तालुक्यातून रात्रीतून व पहाटेपर्यंत जिनिंग परिसरात रस्त्यावर दोन्ही बाजूने कापूस भरलेली हजारो वाहने व बैलगाडी दाखल झाल्या. यामुळे सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली.चार किलोमीटरचा फेराकापूस भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्याने शिंदखेडा-चिमठाणे रस्ता सकाळी ११ वाजेपर्यंत संपूर्ण बंद झाला होता. ११ वाजता पोलीस आले. त्यांनी रस्ता वळण रस्ता काढला. त्यामुळे नाहक कुमरेज व परसामळ असे ४ किलोमीटर अंतर फिरून या रस्त्यावर यावे लागत होते. सायंकाळपर्यंत वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ होती.विद्यार्थ्यांची केविलवाणी स्थितीसध्या बारावीची परीक्षा सुरू असून संपूर्ण रस्ता कापसाच्या वाहनांनी बंद केल्यामुळे चिमठाणेकडून येणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी परीक्षेसाठी स्टेशनजवळून अक्षरश: रडत-रडत पळत होते. त्यात काही शेतकऱ्यांनी शहरात फोन केला. त्यानंतर खाजगी वाहनाने काही विद्यार्थांना मिनिडोअर चालकांनी सोडले.काहीही बोलण्यास नकारदरम्यान, कापूस खरेदी बंद होणार का, एवढी गर्दी होऊन रस्ता बंद झाला तरी याचे नियोजन का करण्यात आले नाही, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी येथील ग्रेडरची प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र, कोणत्याही प्रकारे माध्यमांशी बोलण्यास वरिष्ठांनी मज्जाव केला असून ११ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथून लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे काहीही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर याबाबत औरंगाबाद येथील सीसीआयचे अधिकारी उमंग व दास यांच्याशी दूरध्वनीवरुन अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आॅपरेटरने माध्यमांचे नाव ऐकून फोन बाजूला काढून ठेवला. यामुळे कापूस खरेदी खरच बंद होणार कि सुरु राहणार, हे समजू शकले नाही.ऐन परीक्षेच्या काळात संपूर्ण रस्ता दिवसभर बंद असल्याने सायंकाळी लहान मुलांच्या शाळेच्या वाहनाचेही हाल झाले. शेवटी सर्व वाहने कुमरेज-परसामळ गावाला वळसा मारून, ४ किलोमीटर फिरून परत रस्त्यावर येत होती. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकºयांची वाहने सुरळीतपणे लावण्याचे नियोजन तात्काळ करणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सीसीआयच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्हसीसीआयचे अधिकारी प्रसार माध्यमांपासून काय लपवित आहेत. प्रसार माध्यमांना काहीही माहिती न देण्यामागील कारण काय आहे. सीसीआयचे औरंगाबाद येथील अधिकाºयांनी अशी कोणती माहिती दडविण्यासाठी सर्व ग्रेडरला लेखी ताकीद दिली आहे.सरकारने खुलासा करावादरम्यान, आघाडी सरकार हे शेतकºयांचे सरकार आहे, असे मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री ठासून सांगत आहेत. मग कापूस खरेदी बंद करणार कि सुरू ठेवणार, याबाबत खुलासा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. तसेच शेतकºयांना अडचणीत का आणत आहेत, असा सवालही कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकºयांकडून व्यक्त करण्यात आला.कापूस खरेदी बेमुदत बंददरम्यान, कापूस खरेदीचा साठा जिनिंग प्रेसिंगच्या ओट्यावर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे व कापसाच्या गाठी ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्यामुळे २७ फेब्रुवारीपासून सीसीआय कापूस खरेदी करणार नाही, असे सीसीआय केंद्रप्रमुखांनी कळविले आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र बेमुदत बंद राहणार असल्याने तिन्ही केंद्रावर शेतकºयांनी माल आणू नये, असे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी जाहीर सूचना पत्रकाद्वारे शेतकºयांना आवाहन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे