लसीकरणाचेच लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:20+5:302021-04-11T04:35:20+5:30

धुळे : जिल्ह्यात ५ एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे मागील पाच दिवसांपासून बाजारपेठ ठप्प झाली आहे, तसेच खासगी ...

Vaccination lockdown! | लसीकरणाचेच लॉकडाऊन !

लसीकरणाचेच लॉकडाऊन !

googlenewsNext

धुळे : जिल्ह्यात ५ एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे मागील पाच दिवसांपासून बाजारपेठ ठप्प झाली आहे, तसेच खासगी वाहतुकीसह अनेक बाबींवर निर्बंध आले आहेत. या निर्बंधांचा व लसींच्या तुटवड्याचा लसीकरणावर परिणाम झाला असून, लसीकरणाची गती मंदावली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. ग्रामीण भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र पुरेशा डोसअभावी अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद पडले आहे.

लसीकरणाला जाताना पोलिसांनी अडवले तर...

मी साक्री रोड परिसरात वास्तव्याला आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असल्याने कोरोनाची लस घ्यायची आहे; मात्र काही दिवसांपासून निर्बंध अधिक कडक झाल्याने लस घेण्यासाठी बाहेर गेलो तर पोलीस अडवणार तर नाहीत ना, अशी भीती वाटते. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लस घेणार आहे.

- देवीदास पाटील

कोरोनाची लस घ्यायची आहे; मात्र लसीकरण केंद्र घरापासून बऱ्याच अंतरावर आहे. वय जास्त आहे, तसेच इतरही व्याधी आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणे टाळतो आहे. जय हिंद कॉलनी परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे. त्यामुळे माझ्यासह परिसरातील इतर ज्येष्ठ नागरिकांनाही लसीकरण करणे सोपे जाईल.

- रमेश सोनवणे

कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेलो होतो; मात्र लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परत यावे लागले; मात्र त्याच लसीकरण केंद्राच्या परिसरात कोरोना चाचणीही करण्यात येत होती. त्यामुळे भीती वाटली. लसीकरण व कोरोना चाचणी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी करायला पाहिजे.

- प्रमोद खैरनार

मिनी लॉकडाऊनचा लसीकरणाच्या गतीवर परिणाम झाल्याचे वाटत नाही. लसींचा तुटवडा भासत असल्याने मात्र काही लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. पुरेसे डोस मिळाल्यानंतर लसीकरणाला पुन्हा गती मिळेल. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Vaccination lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.