टॅँंकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:08 PM2020-06-22T13:08:43+5:302020-06-22T13:09:15+5:30

दोंडाईचा : एकजण जखमी, अपघातग्रस्त टॅँकर पोलीसांनी घेतला ताब्यात, चालक फरार

The two-wheeler was killed on the spot in the collision of the tanker | टॅँंकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा :भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅँकरने मोटरसायकल जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार व अन्य एक जण जखमी झाला. हा अपघात दोंडाईचा-शहादा रस्त्यावर उड्डाणपुलाच्या पुढे रविवारी सायंकाळी झाला.
शहादा-दोंडाईचा रस्त्यावर भरधाव जाणाºया आॅईलच्या टँकरने (एमएच ४१-व्ही ५१०६) मोटर सायकलला (एमएच ३४ -अ‍ेके ३६९९) जोरदार धडक दिली.त्यात शहादा तालुक्यातील मनरद येथील रहिवाशी व शहादा येथील विकास हायस्कुलमध्ये शिपाई असलेला दीपक साहेबराब भामरे (वय ३०)हा जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेला दिनेश पवार जखमी झाला आहे. मयत दीपक याच्या पश्चात आई वडील व एक भाऊ आहे. घटना स्थळी दोडाईचा पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड,उपनिरीक्षक डॉ. संतोष लोले, दिनेश मोरे यांच्यासह संस्थेचे चेअरमन व नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि. प . सदस्य अभिजित पाटील आदींनी भेट दिली. दरम्यान मयत दीपक भामरे यास दोडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.टॅँकर पोलिसांनी ताब्यात घेतला केला असून चालक फरार आहे.

Web Title: The two-wheeler was killed on the spot in the collision of the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे