शंभरफुटी रोडवरुन दोघा चोरट्यांना सापळा लावून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 10:53 PM2021-02-27T22:53:56+5:302021-02-27T22:54:24+5:30

चाळीसगाव रोड पोलीस : दोघांनी दिली गुन्ह्याची कबुली

Two thieves were caught on a 100-foot road | शंभरफुटी रोडवरुन दोघा चोरट्यांना सापळा लावून पकडले

शंभरफुटी रोडवरुन दोघा चोरट्यांना सापळा लावून पकडले

googlenewsNext

धुळे - शहरातील शंभरफुटी रोडवर दोन चोरटे चोरलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी आले असल्याची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा लावला आणि दोघांना शिताफिने पकडण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
शहरातील अंबिका नगरात राहणारे घनश्याम मोहनलाल बिसावा (५६) या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडे १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान चोरट्यांनी चोरी करुन १ लाख २ हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला होता. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा तपास सुरु असतानाच दोन चोर शंभरफुटी रोड भागात चोरुन घेतलेल्या ऐवजची विक्री करण्याच्या उद्देशाने ग्राहक शोधत आहेत. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, योगेश ढिकले, पोलीस कर्मचारी शेख, भुरा पाटील, प्रेमराज पाटील, मुख्तार शहा, स्वप्निल सोनवणे, चेतन झोलेकर, सुशील शेंडे, संदिप वाघ, सोमनाथ चौरे यांनी सापळा लावला. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात इम्रान उर्फ चाट्या रफिक शेख (२१, रा. दोन हजार वस्ती, इब्राहिम मशिदजवळ, धुळे) आणि शोएब उर्फ बबल्या शेरु पिंजारी (२३, रा. अंबिका नगर, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून घटनेचा उर्वरीत तपास सुरु आहे.

Web Title: Two thieves were caught on a 100-foot road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे