टँकरच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार

By Admin | Updated: March 13, 2017 01:18 IST2017-03-13T01:18:37+5:302017-03-13T01:18:37+5:30

दुधवे येथील रहिवासी : गुजरातमधील घटना

Two students killed in tanker shock | टँकरच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार

टँकरच्या धडकेत दोन विद्यार्थी ठार

नवापूर : सोंगाडय़ा पार्टी पाहण्यासाठी जात असताना टँकरच्या धडकेत दुधवे ता. नवापूर येथील दोन विद्यार्थी ठार झाल्याची घटना गुजरात हद्दीतील भडभुंजा येथे शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. हे दोघे दहावीत शिकत होते.
 रोहित सुरेश नाईक (16)  व युवराज रवींद्र वळवी (16, रा. दुधवे ता. नवापूर) हे  11  रोजी दुचाकीने (एमएच 39-0107) उमराण येथे आयोजित सोंगाडय़ा पाहण्यास गेले. तेथून गुजरात हद्दीजवळील  लक्कडकोट येथे सोंगाडय़ा पार्टी पाहण्यासाठी जात होते. वाटेत  भडभुंजा बसस्थानकाजवळ गॅस टँकरने (क्रमांक जीजे 6- एयू 6250) दुचाकीला मागून ठोस दिल्याने रोहित व युवराज यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अनिल फत्तेसिंग वळवी याने फिर्याद दिल्याने उच्छल पोलिसात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     (वार्ताहर)
रोहित हा उत्कृष्ट व्हॉलिबॉलपटू होता. व्हॉलिबॉल सामन्यांमध्ये उत्कृष्ट लिफ्टर म्हणून त्याची ओळख आहे. राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम ंविजेत्या सामन्यातही त्याने नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.  युवराजच्या पश्चात आई व एक बहीण, तर रोहितच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आहे.

Web Title: Two students killed in tanker shock