शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरमेपाडा शिवारातील विचित्र अपघातात महिला ठार, 18 प्रवाशांसह दोन पोलीस जखमी

By admin | Updated: April 14, 2017 17:59 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारातील शनीमंदिराजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी आरामदायी बसने पुढे चालणा:या ट्रकला मागून धडक दिली.

 पुरमेपाडा शिवार : जखमींना रूग्णवाहीकेत टाकतांना ट्रकची पोलीस वाहनाला धडक

धुळे,दि.14- मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा शिवारातील शनीमंदिराजवळ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी आरामदायी बसने पुढे चालणा:या ट्रकला मागून धडक दिली. त्यात बसमधील एका अनोळखी महिला ठार व 18 प्रवासी जखमी झाले. दरम्यान, त्या जखमींना रूग्णवाहीकेत टाकतांना  जवळ उभ्या पोलीस वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिली़ पोलीस वाहन रूग्णवाहीकांवर आदळल़े त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल़े 
मालेगावकडून धुळ्याकडे येणारी खासगी प्रवासी  बस (एमपी 09-जी 1623) शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पुरमेपाडा शिवारातील हॉटेल शिवशक्ती व शनिमंदिरा पुढे चालणा:या ट्रकवर (एमएच 15-ईई 2545) आदळली. त्यात बसमधील अनोळखी महिला (वय 50) ठार झाली. तर अत्तारसिंग (34), हेरेन भिलाजी (47) रा.बेंगलोर, दर्शन एच.एल (21) रा.कर्नाटक, रूपल संतोष बिलेख्या (20), स्वप्नील संजय बुगले (30) रा.पाथर्डी, राघवेंद्र रणवीर भडेरीया (52) रा.ग्वाल्हेर, भास्कर प्रसाद रामअवतार (57) रा.हैद्राबाद, विजयलक्ष्मी भास्कर प्रसाद (52) रा. हैद्राबाद, संजय पुरोहित (48) रा.इंदूर, राजू यादव (30) रा.इंदूर, निनाज हेबजोर कुरेशी (30) रा.महु (मध्यप्रदेश), राजा ना:या पवार (33) रा. बंगलगांव, हितेष शंकरलाल भोई (32), केशरबाई हितेष भोई (28), प्रेमकुमार हितेष भोई (12), सागर हितेश भोई (8), सर्व रा.बगेदा ता. आसपूर जि.डोंगरपूर (राजस्थान), आसीम बागरे (21) रा.हरदा इंदूर, मोमीन मोमय्या (23) रा.इंदूर हे जखमी झाले. यांना शासकीय रूग्णवाहिकेतून मालेगाव व धुळे येथील हिर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.
याठिकाणी एक रूग्णवाहिका जखमींना घेऊन गेली होती. तर दुसरी मालेगांव येथील रूग्णवाहिका (एमएच 14- जीएल 0411) आली होती. तिला लाईट नसल्याने त्यामागे पोलीस वाहन अंबर दिवा व इंडीकेअर लावून उभे करून जखमींना रूग्णवाहिकेत बसवित असतांना मालेगावकडून येणा:या ट्रकने (एमपी 07-एमबी 3986) पोलीस वाहनाला धडक दिली़ त्यामुळे पोलीस वाहन  रूग्णवाहीकेवर (एमएच 18-अेअे 0310) व ( एमएच 14 सीएल 0411)  आदळल़े त्यात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. त्यात हवालदार छगन नथ्थू शिवदे व नारायण देसले हे दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांनाही 108 क्रमांकाच्या रूग्णवाहीकेव्दारे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल़े