बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST2021-03-24T04:33:54+5:302021-03-24T04:33:54+5:30

बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी अचानक या ...

Two employees of Boradi Primary Health Center suspended | बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन कर्मचारी निलंबित

बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन कर्मचारी निलंबित

बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी अचानक या आरोग्य केंद्राला भेट दिली होती. या भेटीदरम्यान अध्यक्षांना प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्वच्छता व शासनाच्या विविध योजनांचा दुरुपयोग आढळून आला. तसेच कनिष्ठ सहायक योगेश राजन गुरव व स्वीपर दादासाहेब नगराळे अनुपस्थित आढळून आले होते. त्यांची माहिती घेतली असता मद्यपान करून वारंवार विनापरवानगी गैहजर राहत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा देशमुख यांना संबंधितांचा अहवाल सादर करण्याची सूचना केली होती.त्यानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी जि.प.कार्यकारी मुख्याधिकारी यांना २३ फेब्रुवारी रोजी अहवाल सादर केला होता.

सादर अहवालात मद्यपान करणे, कोणत्याही प्रकारे पूर्वपरवानगी न घेता कार्यालयात सतत गैरहजर राहणे, वरिष्ठ कार्यालयाने वेळोवेळी मागणी केलेली माहिती मुदतीत सादर न करणे. कार्यालयीन नोटीसचा मुदतीत खुलासा सादर न करणे आदी कारणांनी कार्यालयीन कामकाजात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जि.प.कार्यकारी मुख्याधिकारी यांनी बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहायक, योगेश राजन गुरव व स्वीपर दादासाहेब नगराळे या दोन कर्मचाऱ्यांना तीन महिन्यासाठी निलंबित केले आहे.

कोविड महामारीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी न घेण्याऱ्या व अधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर यापेक्षा अधिक कठोर कारवाई करण्यात येईल - डॉ.प्रसन्न कुलकर्णी तालुका वैद्यकीय अधिकारी शिरपूर.

Web Title: Two employees of Boradi Primary Health Center suspended