धुळे : येथील योग वेदान्त सेवा समिती, संत आसाराम आश्रम महिला उत्थान समितीतर्फे ११ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत तुळशी पूजन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी हा कार्यक्रम होत आहे.या पंधरवड्याअंतर्गत विविध काॅलन्यांमध्ये जावून तुळशी महिमा, तुळशीचे महत्व सांगून पुजन केले जात आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीचे महत्व अनन्ययाधारण आहे. देशातच नव्हे तर इतरही देशांमध्ये तुळशी पूजन दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे.तुळशी पूजन पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी समितीच्या महिला अध्यक्षा मंगला अटकाल, त्रिवेणी विसपुते, काळे, देगडे परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}