शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमुंडा येथील हनुमानाची मूर्ती तुलसीदासांनी दिलेला प्रासादिक ठेवा

By admin | Updated: April 11, 2017 15:34 IST

कुकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात तुलसीदासांनी हनुमान मूर्ती भेट दिली होती़ हा भक्तीचा ठेवा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत आह़े

 400 वर्षाची परंपरा : महाराष्ट्र व गुजराथ राज्यातील भाविकांचे नाते होतेय बळकट 

नंदुरबार,दि.11- रामचरितमानस, दोहावली आणि हनुमान चालिसा यासारख्या साहित्याची रचना करणा:या संत तुलसीदास यांचा आणखी एक ठेवा नंदुरबार जिल्ह्यापासून काही अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुडा येथे आजही अबाधित आह़े कुकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात तुलसीदासांनी हनुमान मूर्ती भेट दिली होती़ हा भक्तीचा ठेवा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत आह़े  
गुजरात राज्यातील कुकरमुंडा हे गाव संत खंडोजी  महाराजांचे समाधीस्थळ म्हणून सर्वश्रुत आह़े गुजरात आणि खान्देशात वैैष्णवांचे श्रद्धास्थान म्हणूनही खंडोजी महाराजांचे नाव घेतले जात़े याच खंडोजी महाराजांच्या कुकरमुंडा या गावी, साधारण 400 वर्षापूर्वी निवास करणारे संत जसवंत स्वामी हे काशी येथे गेले असता, त्याठिकाणी त्यांची आणि संत तुलसीदास यांची भेट झाली़ या भेटीदरम्यान दोघांमध्ये ब:याच विषयांवर चर्चा झाली़ संत जसवंत स्वामी यांच्या ज्ञानापासून प्रभावित होऊन, त्यांना तुलसीदास यांनी धातूची दोन फूटांची हनुमानाची प्रासादिक मूर्ती भेट म्हणून दिली़ ही मूर्ती कुंकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात आजही जशीच्या तशी आह़े काळ्या पाषाणातील रामाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होणारी ही मूर्ती भाविकांना अनेक मार्गातून वाट दाखवणारी असल्याची धारणा येथील भाविकांची आह़े गुजरात राज्यातील भाविकांसह महाराष्ट्रातील भाविक राम मंदिरात दर्शनासाठी जातात़ 
कुकरमुंडा येथील ज्येष्ठ नागरिक उमेश शहा यांच्यासोबत यावेळी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, हनुमान जयंतीपेक्षा रामनवमीला याठिकाणी मोठा कार्यक्रम होतो़ रात्रभर तुलसीदासांची विविध पदे गायली जातात़ या पदांच्या दरम्यान लंकादहनाचा सजीव आरास सादर केला जातो़ संस्थानातील जांभळाच्या झाडाला चिंध्या बांधून हनुमानाचा वेश धारण करणा:याकडून हे झाड पेटवत असल्याचा देखावा अनुभवण्यासाठी दोन्ही राज्यातील शेकडो भाविक याठिकाणी दाखल होतात़ 
मूर्तीबाबत अनेक अख्यायिका प्रसिद्ध 
कुकरमुंडा येथील राममंदिरातील हनुमान मूर्तीबाबत एक अख्यायिका प्रसिद्ध आह़े ही अख्यायिका म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वी कुकरमुंडा गावालगत वाहणा:या तापीनदीला मोठा पूर आला होता़ या पुराचे पाणी गावार्पयत आले होत़े हे पाणी कमी व्हावे म्हणून, नदीकाठावर हनुमानाची मूर्ती ठेवण्या आली़ ही मूर्ती रात्रभर याठिकाणी ठेवल्यानंतर पाणी कमी झाल़े काही दिवसांनी मात्र मूर्तीच्या बेंबीतून पाणी पाझरत असल्याचे दिसून आल़े अनेक वर्ष हे पाणी असेच निघत असल्याचे सांगितले जात़े 
कुकरमुंडा येथील खंडोजी महाराज संस्थानाचे गादीपती ह़भ़प उद्धव महाराज यांना याबाब माहिती विचारली असता, त्यांनी सांगितले की, हा एक अनोखा ठेवा आह़े संत जसवंत स्वामी यांच्या भक्ती आणि ज्ञानाला साद देत तुलसीदासांनी ही भेट दिली होती़ यामुळे दोन प्रांतातील नाते अधिक बळकट झाले होत़े