७६ मजुरांना एका वाहनात कोंबून त्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:23 PM2020-06-30T22:23:25+5:302020-06-30T22:23:46+5:30

शिरपूर : तहसीलदारांची कारवाई, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

Transportation of 76 laborers in one vehicle | ७६ मजुरांना एका वाहनात कोंबून त्याची वाहतूक

dhule

Next

शिरपूर : तालुक्यातील आदिवासी भागातून शेतीकामासाठी एकाच वाहनात अक्षरश: कोंबून - कोंबून मजूर घेऊन जाणारे वाहन तहसीलदार आबा महाजन यांनी सोमवारी पकडले. त्या वाहनातून तब्बल ७६ मजूर निघाले. विशेषत: त्यात बालमजुर मोठ्या प्रमाणात होते़ वाहन पोलीस स्टेशनला जमा करुन वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन फिजिकल डिस्टन्सिंगचे सांगितले जात असतांना तालुक्यात मात्र अवैधपणे शेती कामासाठी मजुरांची ने - आण सुरु आहे.
कोरोना संदर्भात तहसिलदार आबा महाजन हे सोमवारी सायंकाळी ग्रामीण भागात गस्त घालित असतांना महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याजवळ सावळदे गावाकडून येणारे पिकअप गाडी (क्रमांक एम़एच़०४-एफयू-१२५२) थांबविली़ सदर मजूर हे मध्यप्रदेश सरहद्दीवरील बिजासन घाट परिसरातील असल्याचे सांगण्यात आले़ त्या गाडीतील मजुरांकडे तोंडाला बांधण्यासाठी मास्क नव्हता, एकाच वाहनात तब्बल ७६ मजूर, त्यातही बहुतांशी बालमजुर मिळून आलेत़ मजुरांना अक्षरश: कोंबून- कोंबून एकाच वाहनात भरले होते. कोरोनाचा कहर सुरू असतांना मजुरांची अशी वाहतूक करणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्या सारखेच आहे.
तहसीलदार आबा महाजन यांनी लागलीच पोलिस प्रशासनाला कळविल्यानंतर सदर गाडी पोलिसांनी जप्त केली़ सदर वाहन पोलिस ठाण्यात नेल्यानंतर काही वेळानंतर त्या मजुरांना सोडण्यात आले़ मात्र वाहन चालकाविरोधात अवैद्य प्रवाशी वाहतुक केल्यामुळे कारवाई करण्यात आली़
ग्रामीण भागात अशापद्धतीने मोठ्याप्रमाणावर अवैध वाहतूक दररोज सुरु आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Transportation of 76 laborers in one vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे