शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयातील ६४ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:59 IST

टंचाई निवारण्यासाठी ८९ उपाय योजना प्रस्तावित,यावर्षी फक्त ४२ लाखांचा खर्च अपेक्षित

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता जवळपास कमीच आहे. मात्र भूजल सर्वेक्षण विभागाचा निरीक्षण अहवाल आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सर्वेक्षणानंतर प्रशासाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यात जानेवारी ते जून २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ६४ गाव व २५ वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसू शकते. त्यासाठी ४२ लाखाचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता एस.बी.पढ्यार यांनी दिली.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५३१.६५ मी.मी आहे. मात्र गेल्यावर्षी आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस झाला. यावर्षी जवळपास सव्वाशे टक्के पाऊस झाला आहे. अनेक वर्षानंतर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. सर्वच नद्या, विहिरी, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. जमिनीत ओलावा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील गाव, वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता खूपच कमी आहे.तरीही जिल्हा परिषद प्रशासनातर्फे संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केलेला असून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला आहे.टंचाईचे तीन टप्पेदरवर्षी पाणी टंचाईचे तीन टप्पे करण्यात येत असतात. यात आॅक्टोंबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्यानुसार आराखडा सादर करण्यात येत असतो. मात्र गेल्यावर्षी दमदार पाऊस झाल्याने, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत एकाही गावाला पाणी टंचाईची झळ बसली नाही.टंचाईच्या दुसऱ्या टप्यात जानेवारी ते मार्च २०२० या कालावधीत जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एकाच गावाला पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.मात्र एप्रिल ते मे २०२० या कालावधीत जिल्ह्यातील ६३ गावे व २५ वाड्यांमध्ये पाणी टंचाई भासू शकते, असे आराखड्यात नमूद केलेले आहे. यात धुळे तालुक्यातील १५ गावे, साक्री तालुक्यातील १५ गावे २१ वाड्या, शिरपूर तालुक्यातील १७ गावे ३ वाड्या, व शिंदखेडा तालुक्यातील १७ गावे एक वाडीचा समावेश आहे.८९ उपाययोजना प्रस्तावितआगामी काळात जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी ८९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी ४८ लाखांचा खर्च येणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Dhuleधुळे