शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा मांडला चोरट्यांनी उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:53 IST

मोराण्यासह धुळ्यात घरफोडी : बंद घराचा फायदा घेत चोरीचे सत्र, भीतीचे वातावरण

धुळे : तालुक्यातील मोराणे प्ऱ लळींगसह धुळ्यात भरदिवसा घरफोडीच्या घटना घडल्यामुळे लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला़ चोरट्यांनी उच्छाद मांडलामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ मोराणे प्ऱ लळींग येथील गुरु गणेश नगरात राहणारे रणजित चिंधा साळुंखे यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधली़ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत १२ हजाराची रोकड असा ऐवज चोरुन नेला आहे़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली़ पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी वरिष्ठांना ही माहिती दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक आऱ एम़ काळे, उपनिरीक्षक गजानन गोटे तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ चोरट्यांचा माग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ मोराणे येथील कमलेश राजपूत यांच्याही घरी चोरट्यांनी डल्ला मारला़ त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, ९० हजार रुपये किंमतीचे ४५ ग्रॅम सोने, २४ हजार रुपये किंमतीचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३४ हजार रुपये किंमतीचे १७ ग्रॅम वजनाचे दागिने, ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, २५ भार चांदी, ४६ हजार रुपयांची रोकड असे मिळून लाखों रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला आहे़ चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस       निरीक्षक काळे घटनेचा तपास करीत आहेत़ मालेगाव रोडवरील दोन घटनामालेगाव रोडवरील महावीर हौसिंग सोसायटीत राहणारे आशिष वसंत लिंगाडे (३९) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बुधवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ४० हजारांची घरफोडी चोरट्यांनी केली आहे़ चोरट्याने घरात घुसून १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा लंपास केल्या़ मालेगाव रोडवरील वल्लभ नगरात राहणारे महेश सुरेश काबरा (५२) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, दुपारी साडेबारा ते दुपारी २ वाजेदरम्यान, चोरट्यांनी हातसफाई केली आहे़ १०० आणि ५०० रुपये दराच्या नोटा असे एकूण २० हजार रुपये लांबविले़ ते घरी आल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ हिंमत वाढली घरफोडी ही शक्यतोअर पहाटे किंवा मध्यरात्रीच्या सुमारास होत असतात़ पण, आता चोरट्यांनी मजल मारत दिवसा घरफोडी करुन चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले असल्याचे घडणाºया घटनांवरुन समोर येत आहे़ दिवसा भ्रंमती करायची, बंद घर दिसले की हातसफाई करायची असे धोरण बहुधा चोरट्यांनी आखले असावे, असा अंदाज आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी