शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राऊळ नगरात घराचा दरवाजा तोडून पावणेदोन लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:15 IST

दोंडाईचा : सोने, चांदीच्या दागिन्यांसह ५० हजाराची रक्कम लांबविली

दोंडाईचा : येथील राऊळ नगरात घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवित चोरट्यांनी लोखंडी कपाटातून दोन तोळे सोने, एक किलो चांदी,  चांदीचे दागिने,  ५० हजार रुपयांची रोकड असा सुमारे पावणेदोन लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.   दोंडाईचा येथील  राऊळ नगर परिसरातील जयचंद्रा हौसिंग सोसायटीत उदय छात्रालयात कार्यरत असलेले अजितसिंग जगतसिंग गिरासे यांची दोन मजली इमारत आहे. गुरुवारी रात्री आपल्या परिवारासह ते वरच्या मजल्यावर झोपले होते. दरम्यान, खालच्या मजल्यात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटाजवळ पलंग असून त्या पलंगाच्या गादी खालून कपाटाची किल्ली काढली. त्या किल्लीने कपाट उघडून कपाटातील दोन तोळे सोने, एक किलो चांदी व  चांदीचे दागिन्यांसह ५० हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे पावणेदोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी  लांबविला.शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अजितसिंग गिरासे यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी व चौकशी केली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे