शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नांथे सरपंचांच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:07 IST

होळनांथे परिसरात चोरीचे सत्र : पिंपळे येथेही चोरट्यांनी केला हात साफ

होळनांथे : शिरपूर तालुक्यातील होळनांथे परिसरात चोरीचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी रात्री नांथे येथील सरपंचांच्या घरी चोरी केली. येथून चोरट्यांनी दोन मोबाईल लांबविले. तसेच सरपंचांच्या सासूची पेटी फोडून ऐवज लांबविला. मात्र, सासू बाहेरगावी असल्याने किती ऐवज गेला ते समजू शकले नाही. त्यानंतर  गावातीलच एका घराचे कुलूप तोडून तेथून मोबाईल व चांदीचे दागिने लांबविले. त्यानंतर चोरट्यांनी पिंपळे पुनर्वसन या गावाकडे मोर्चा वळविला. तेथे घराचे कुलूप तोडून ९० भार चांदी, ५ ग्रॅम सोन्यासह ६ हजार रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.नांथे ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदनाबाई जयपाल राजपूत यांच्या घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल लांबविले. तसेच त्यांच्या सासूंच्या खोलीतील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून घराबाहेर फेकून दिली. तसेच घरातील सामान्य अस्ताव्यस्त केले आहे. मात्र, सासू बाहेरगावी असल्याने पेटीतून किती रक्कम अथवा दागिने चोरीला गेले ते समजू शकले नाही. त्यानंतर चोरट्यांनी नांथे गावातीलच गुलाबकोरबाई रामसिंग राजपूत यांच्या खोलीचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला. सर्व परिवार सुरत येथे असल्याने त्या घरात एकट्याच होत्या. त्या झोपलेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्यावर गुंगीचे औषध फवारल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून मोबाईल, चांदीचे दागिने लांबविले. त्यानंतर मागच्या खोलीचा दरवाजा उघडून चोरटे पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी पिंपळे पुनर्वसन या गावाकडे मोर्चा वळविला.  तेथे मनोहर रामदास जाधव हे संपूर्ण परिवारासह बाजूच्या घरात झोपल्याचे हेरुन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातून ९० भार चांदी, ५ ग्रॅम सोने, ६ हजार रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, वाहनाची कागदपत्र लंपास केले. याप्रकरणी नांथे सरपंचांचे पती जयपाल राजपूत व मनोहर रामदास जाधव यांनी थाळनेर पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, होळनांथे परिसरात चोरीचे सत्र सुरुच असून अगोदरच्या घटनांचा तपास लागलेला नसताना पुन्हा एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नूतन उपनिरीक्षकांना सलामीथाळनेर पोलीस स्टेशनला नवीन उपनिरीक्षक म्हणून सचिन साळुंखे रुजू झाले आहेत. चोरट्यांनी एकाच रात्रीतून तीन ठिकाणी चोरी करुन उपनिरीक्षकांना सलामी दिल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु होती. तसेच पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे