थाळनेर पोलिसांची सतर्कता, गुरांची तस्करी केली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:53 PM2021-02-28T17:53:30+5:302021-02-28T17:53:58+5:30

लाखोंचा मुद्देमाल जप्त; आरोपी फरार

Thalner police alert, cattle smuggling revealed | थाळनेर पोलिसांची सतर्कता, गुरांची तस्करी केली उघड

थाळनेर पोलिसांची सतर्कता, गुरांची तस्करी केली उघड

Next

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैधरित्या गुरांची होणारी वाहतूक उघड केल्याने १७ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणातील संशयित आरोपी मात्र फरार झाले आहेत.
शिरपूर चोपडा रस्त्यावरुन पहाटे अवैद्यरित्या गोवंश जनावरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना मिळाल्याने त्यांनी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, कर्मचारी प्रकाश मालचे, कृष्णा पावरा, उन्मेश आळंदे आदींनी सापळा लावून शिरपूर चोपडा रस्त्यावरील तोंदे गावाजवळ युपी २७ टी २६७२ या कंटेनर वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात ५२ गोवंशीय जनावरे दाटीवाटीने आखूड दोरीने बांधलेली आढळून आलेत. वाहनातील तिनही आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले आहेत़ थाळनेर पोलिसांनी १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गुरांना सावेर येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी प्रकाश मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: Thalner police alert, cattle smuggling revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे