शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरीय अ.भा. विद्यार्थी विज्ञान मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:44 IST

साक्री : म्हसदी विद्यालयाचा संदीप सोनवणे प्रथम, पिंपळनेरची कल्याण चव्हाण द्वितीय

कासारे : साक्री तालुकास्तरीय  अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात म्हसदी येथील सी.डी. देवरे विद्यालयाचा संदीप नवल सोनवणे याने प्रथम तर पिंपळनेर येथील कर्म.आ.मा. पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी कल्याण रत्नाकर चव्हाण हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. त्यांची जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी निवड करण्यात आली आहे.साक्री  तालुक्यातील इयत्ता आठवी ते दहावी  वर्गातील  विद्यार्थ्यांसाठी राज्य विज्ञान संस्था नागपूर व शिक्षण विभाग पंचायत समिती, साक्री, मुख्याध्यापक संघ, साक्री  तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कासारे येथील वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयात ३० जुलै  रोजी तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.व्ही. पवार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.जे. पाटील, मंडळाचे सल्लागार के.डी. सोनवणे, सुहास सोनवणे, एस.डी. खैरनार, कासारे अंनिसचे अध्यक्ष सुरेश पारख, मुख्याध्यापक एस.के. अहिरराव, पी.एम. कदम, एस.आर. खैरनार, प्रविण भामरे आदी उपस्थित होते. मेळाव्यात १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात  म्हसदी येथील सी.डी. देवरे विद्यालयाचा विद्यार्थी संदीप नवल सोनवणे याने प्रथम, पिंपळनेर येथील कर्म.आ.मा. पाटील विद्यालयाच्या कल्याण रत्नाकर चव्हाण हिने द्वितीय तर कासारेच्या मेहता विद्यालयाची मुस्कान असिफ पटवे व दिघावेच्या रितीका महेंद्र दशपुते यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. विजेत्यांना स्व.सतिष मोतीलाल जैन यांचे स्मरणार्थ साक्री येथील किराणा व्यापारी सुनील जैन यांनी स्मृतीचिन्ह दिले. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.सचिन नांद्रे व एस.डी. खैरनार तर वेळ नियंत्रक म्हणून आर.एस. पाटील यांनी काम पाहिले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष पी.झेड. कुवर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस. बच्छाव यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. सुत्रसंचालन ए.एस. पाटील यांनी केले. आभार व्ही.ए. सोनवणे यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी के.आर. अहिरराव, अविनाश सोनार, विजय सोनवणे, व्ही.पी. भदाणे, के.एस. गायकवाड, जी.एल.कांगणे यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Dhuleधुळे