शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना बोलविणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:34 AM2021-04-13T04:34:19+5:302021-04-13T04:34:19+5:30

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे अत्यंत भयावह व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विचारात घेऊन कोरोना ...

Take action against teachers and students in schools | शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना बोलविणाऱ्यांवर कारवाई करा

शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांना बोलविणाऱ्यांवर कारवाई करा

Next

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे अत्यंत भयावह व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विचारात घेऊन कोरोना संकटावर मात करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी तसेच शनिवार-रविवारी पूर्ण कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. या संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने शाळेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना शाळांत ५० टक्के उपस्थिती राहण्यास सुचविले आहे. मात्र शासनाने घोषित केलेल्या निर्बंधांना जाणीवपूर्वक पायदळी तुडवून काही शाळांचे मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना दररोज पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करतात. काही शाळा विद्यार्थ्यांनासुद्धा नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करीत आहेत. ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असून, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या जीवनाशी खेळणारी बाब आहे. खासकरून धुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविडने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक शाळांत कोरोना संकटापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक व्यवस्थासुद्धा निर्माण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याध्यापकांच्या या मनमानी त्रासामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. शासनाचे निर्बंध मोडणाऱ्या मुख्याध्यापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ताकीद संबंधिताना देणे आवश्यक व निकडीचे आहे. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे व विद्यार्थी - शिक्षकांना शाळेत बोलावणाऱ्या संस्थांना व मुख्याध्यापकांना कायदेशीर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Web Title: Take action against teachers and students in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.