प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निलंबित करा; बेलदार समाज संघटना : आरएफओ दीपाली चव्हाण मृत्यूच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:18+5:302021-03-31T04:36:18+5:30

निवेदनात म्हटले आहे की, हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना डीएफओ विनोद शिवकुमार यांनी शारीरिक व मानसिक त्रास ...

Suspend the principal chief ranger; Beldar Samaj Sanghatana: Demand for inquiry into RFO Deepali Chavan's death | प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निलंबित करा; बेलदार समाज संघटना : आरएफओ दीपाली चव्हाण मृत्यूच्या चौकशीची मागणी

प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निलंबित करा; बेलदार समाज संघटना : आरएफओ दीपाली चव्हाण मृत्यूच्या चौकशीची मागणी

निवेदनात म्हटले आहे की, हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना डीएफओ विनोद शिवकुमार यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला. गर्भवती असताना देखील जंगलात तब्बल तीन किलोमीटर चालण्यास भाग पाडल्याने त्यांचा गर्भपात झाला. वन प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने परिसरात केलेले कार्य वरिष्ठांना खपले नसल्याने त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. वन विभागातील तस्करांना लगाम घालण्यासाठी उचललेले धाडसी पाऊल वरिष्ठांना खुपल्याने डीएफओ विनोद शिवकुमार यांनी त्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून छळ केला. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षकांना वेळोवेळी तक्रार करूनदेखील त्यांनी दखल घेतली नाही.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत सखोल चाैकशी करून संबंधित दोषींवर त्वरित कारवाई करावी. अन्यथा, भटक्या विमुक्त व ओबीसी बांधवांमार्फत राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Suspend the principal chief ranger; Beldar Samaj Sanghatana: Demand for inquiry into RFO Deepali Chavan's death