चांदेतांडा येथे तरुण शेतकºयाची आत्महत्या

By Admin | Updated: March 4, 2017 23:42 IST2017-03-04T23:42:52+5:302017-03-04T23:42:52+5:30

धुळे : स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन करून तरुण शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील चांदेतांडा येथे घडली आहे़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़

Suicides of young farmer in Chanditanda | चांदेतांडा येथे तरुण शेतकºयाची आत्महत्या

चांदेतांडा येथे तरुण शेतकºयाची आत्महत्या

धुळे : स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन करून तरुण शेतकºयाने  आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तालुक्यातील चांदेतांडा येथे घडली आहे़ याबाबत तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे़
चांदेतांडा येथील पिंटू भुरा राठोड (वय ३०) या तरुणाने ३ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास स्वत: शेतात काहीतरी विषारी पदार्थाचे सेवन केले़ त्याला भाऊ बबलू राठोड याने उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले़ तेथे उपचार सुरू असताना दुपारी ३़३० वाजता तरुणाचा मृत्यू झाला़ त्याला डॉ़ नितीन देवरे यांनी तपासणी करून मृत घोषित केले़ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही़ पुढील तपास पोलीस नाईक जे़ एस़ सोनार करत आहेत़
गळफासाने आत्महत्या
वलवाडी शिवारातील यशोधन कॉलनीत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़ याबाबत पश्चिम देवपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे़ प्रशांत रमेश पवार (वय ३७, रा यशोधन कॉलनी, वलवाडी, वाडीभोकर रोड, धुळे) असे मयताचे नाव आहे़ त्यांनी ३ मार्च रोजी दुपारी ३़४५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात येथे डॉ़ हर्षल पाटील यांनी तपासणी करून प्रशांत पवार यांना मृत घोषित केले़ पोलीस नाईक जगन्नाथ ईशी यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Suicides of young farmer in Chanditanda