तापी नदीत प्रौढाची आत्महत्या, आकस्मिक मृत्यूची नोंद
By देवेंद्र पाठक | Updated: April 16, 2023 19:58 IST2023-04-16T19:58:28+5:302023-04-16T19:58:36+5:30
रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

तापी नदीत प्रौढाची आत्महत्या, आकस्मिक मृत्यूची नोंद
धुळे : तापी नदीत उडी मारून एका प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. हिरामण सजन भिल (वय ५७, रा. पिंप्री ता. शिरपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील पिंप्री येथे राहणारे हिरामण सजन भिल (वय ५७) हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते.
अशातच अचानक ते थाळनेर गावानजीक तापी नदीच्या पुलावर आले. आपल्याला काेणी अडविणार नाही याची खात्री करून त्यांनी थेट तापी नदीच्या पात्रात उडी मारून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. कोणीतरी पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचे लक्षात येताच तापी काठावरील पोहणाऱ्यांनी त्यांना पाण्याबाहेर काढले.
रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक गांगुर्डे करीत आहेत.