शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:15 IST

साखार आयुक्तांची सकारात्मक भूमिका

धुळे : साखर आयुक्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याच्या साखर आयुक्तांनी ऊसतोड वाहतूक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्रातील ऊस तोडणी कामगारांच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक कामगारांच्या राज्य संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड सुभाष काकुस्ते, कॉम्रेड किशोर ढमाले व सुशीला मोराळे यांनी २८ डिसेंबर रोजी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी सविस्तर चर्चा केली. २३ जुलै रोजी परिपत्रक काढून गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.या परिपत्रकाप्रमाणे, साखर कारखाने हे ऊस तोडणी कामगारांना कारखान्याचे कामगार समजत नसले तरी, कारखान्यांनी ते कामगार असंघटित कामगार सामाजिक अधिनियम २००८ प्रमाणे निश्चित केलेल्या १२२ कामगारांपैकी एक आहेत. त्यामुळे ते कामगार कारखान्याचे कामगार ठरतात. किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार त्यांना किमान वेतन देण्याची जबाबदारी प्रधान मालक म्हणून कारखान्यावर आहे. शिवाय त्यांची हजेरी ठेवणे, पगार पत्रके ठेवणे, वेळेवर पगार अदा करणे, साप्ताहिक सुट्टी देणे, जादा कामाचा मोबदला देणे ही जबाबदारी कारखान्यावर येते. शिवाय स्वच्छताविषयक सामाजिक नियम पाळणे, स्वच्छतागृह व आरोग्य विषयक सेवा, मुलांना शैक्षणिक सवलत  उपलब्धता करणे इत्यादी सवलतीही  त्यांना देण्यात याव्यात. कोरोना काळात हे जास्त आवश्यक आहे, असे साखर आयुक्तांच्या परिपत्रकात म्हटले आहे. कायद्याच्या चौकटीत एखाद्या अधिकाऱ्याने सडेतोड भूमिका घेणे हे पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळे साखर आयुक्तांच्या या निर्णयाचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, या कामगारांच्या ऊस तोडणी वाहतूक दराबाबत अत्यल्प दरवाढीचा करार होऊन इतर मागण्यांसाठी वेगळे महामंडळ स्थापण्याची घोषणा झाली. हे महामंडळ ३१ डिसेंबरपूर्वी अस्तित्वात येणार होते. गेल्या वेळीही गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन झाले होते. पण, निधीअभावी त्याचे कामकाज गुंडाळण्यात आले. ही गोष्ट शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :Dhuleधुळे