पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:29+5:302021-04-16T04:36:29+5:30

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ऑक्टोबर २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षांची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली. त्यात पदव्युत्तर द्वितीय ...

In the student merit list of the journalism department | पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ऑक्टोबर २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षांची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली. त्यात पदव्युत्तर द्वितीय वर्ष पत्रकारिता विभागातील मेघना जोशी या विद्यार्थिनीने ९.१७ ग्रेड सह विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले. तर विभागातील रोशनी बोरसे हिला ९.४ ग्रेड मिळाले असून विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच भूषण नानकर ८.८८ ग्रेड मिळवून विद्यापीठात तृतीय क्रमांक पटकावला.

जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून सातत्याने या वर्षात देखील सुवर्णपदक पटकावले. गुणवंत विद्यार्थ्यांचे ग.कौ. चेअरमन अक्षय छाजेड, सेक्रेटरी युवराज करणकाळ,व्हाईस चेअरमन उदय शिनकर, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अनिल दामोदर सह सर्व गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, प्राचार्य डॉ. पुष्पा गावित, उपप्राचार्य खलील अन्सारी, विभाग प्रमुख प्रा. प्रवीण सूर्यवंशी, प्रा. ललित चव्हाण, प्रा. भूषण वडनेरे सर्व प्राध्यापक यांनी कौतुक केले.

Web Title: In the student merit list of the journalism department