छोट्या विक्रेत्यांना त्रास देणे बंद करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:36 AM2021-04-16T04:36:49+5:302021-04-16T04:36:49+5:30

साक्री शहरात तसेच कॉलनी परिसरामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तरीही साक्री नगरपंचायत तिथे कंटेनमेंट झोनचा फलक ...

Stop harassing small sellers | छोट्या विक्रेत्यांना त्रास देणे बंद करावे

छोट्या विक्रेत्यांना त्रास देणे बंद करावे

Next

साक्री शहरात तसेच कॉलनी परिसरामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तरीही साक्री नगरपंचायत तिथे कंटेनमेंट झोनचा फलक लावत नाही. रुग्ण तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. शहरांमध्ये व कॉलनी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी दहा ते पंधरा नळांना पाणी येत नाही. याकडे नगरपंचायतीने लक्ष देणे गरजेजे आहे. या गंभीर प्रकारांकडे वरिष्ठ प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे. नगरपंचायतीच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही, तर भारतीय जनता पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवासी नायब तहसीलदार अंगद असटकर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर साक्री तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष वेडु सोनवणे, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र अजगे, सुरेश शेवाळे, दिनेश नवरे, अजय लोणखेडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Web Title: Stop harassing small sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.