रेमडेसिव्हर देता कुणी... रेमडेसिव्हर...कोरोनाग्रस्तांच्या नातलगांची इंजेक्शनसाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:32+5:302021-04-10T04:35:32+5:30
सध्या बेड उपलब्ध होत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करावे लागत आहे. मात्र याठिकाणी रुग्णांना रेमडेसिव्हर इन्जेक्शन उपलब्ध होत ...
सध्या बेड उपलब्ध होत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करावे लागत आहे. मात्र याठिकाणी रुग्णांना रेमडेसिव्हर इन्जेक्शन उपलब्ध होत नाही. इन्जेक्शन मिळत नसल्यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी आवाजावी रक्कम वसुल केली जात आहे तर काही ठिकाणी केवळ याच तालुक्यातील रुग्णांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड होत असून हे इंजेक्शन कुठे, कुठे उपलब्ध आहे हे प्रशासनाने जाहीर करुन त्या मेडिकलच्या बाहेर दर्शनी भागावर फलक लावावा व दरांचा देखील या फलकावर उल्लेख करावा अशी मागणी आहे.
आई कोरोना बाधित आहे. बेड उपलब्ध झाले नाही म्हणून शहादा येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. मात्र रेमडेसिव्हर इन्जेक्शन मिळत नाही. नंदुरबार, शहादा, धुळे, दोंडाईचा कुठेही उपलब्ध नाही. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- आर. आर. राजपूत, मालपूर