कर्जमाफीसाठी आतापर्यंत १४८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:06 PM2020-02-25T12:06:45+5:302020-02-25T12:09:03+5:30

शेतकरी कर्जमुक्ती योजना : थाळनेर, मुकटीला आधार प्रमाणीकरण सुरू, दोन दिवस चालेल प्रक्रिया

So far 5 farmers are eligible for loan waiver | कर्जमाफीसाठी आतापर्यंत १४८ शेतकरी पात्र

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाआघाडी सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी धुळे जिल्ह्यात आधार प्रमाणीकरणाचा सोमवारी शुभारंभ झाला़ पहिल्या टप्प्यात मुकटी आणि थाळनेर येथे सोमवारपासुन प्रशासनाने शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू केले आहे़ दोन्ही गावात आतापर्यंत १४८ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत़ दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पुर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली़
मुकटी (ता. धुळे), थाळनेर (ता. शिरपूर) येथे कर्जमाफीसाठी शेतकरी आधार प्रमाणिकरणाची चाचणी घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शेतकºयांशी संवाद साधत या योजनेची माहिती दिली.
मुकटीत ५८१ शेतकºयांची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली आहे. या गावातील २९९ शेतकरी सेंट्रल बँक आॅफ इंडिया, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुकटी शाखेचे २०६, बँक आॅफ महाराष्ट्रचे १०, आयडीबीआय बँकेचे ५, तर एक शेतकरी युको बँकेचे थकबाकीदार आहेत. त्यानुसार सोमवारी सकाळपासून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी मुकटी गावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.धुळे या बँकेच्या मुकटी शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र, तर पाच ठिकाणी सामान्य सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत़
आधार प्रमाणीकरण करताना जिल्हाधिकारी गंगाथरन डी., उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, तहसीलदार किशोर कदम, तालुका उपनिबंधक श्री. वीरकर, कृषी अधिकारी महेंद्र वारुळे, जिल्हा परिषद सदस्या मंगला पाटील, सरपंच ललिता सैंदाणे, मुकटी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम सूर्यवंशी आदींसह लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मुकटी येथे एकूण ४५० शेतकºयांचा समावेश होता. त्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. या योजनेबाबत शेतकºयांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले़
जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. मुकटी येथे अपलोड कर्ज खाते संख्या ५७६, विशिष्ट क्रमांक कर्ज खाते संख्या ४५०, आधार प्रमाणिकरण झालेल्या कर्ज खात्यांची संख्या ६४ आहे़ तर थाळनेर येथे अपलोड कर्ज खाते संख्या ३०५, विशिष्ट क्रमांक यादीतील कर्ज खाते संख्या २६०, तर आधार प्रमाणिकरण झालेल्या कर्ज खात्यांची संख्या ८४ आहे.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुकटी येथील शाखेस भेट देवून कर्जमुक्ती योजनेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यांच्या हस्ते शेतकºयांना आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. माजी सरपंच उमाकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: So far 5 farmers are eligible for loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे