शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच ठिकाणी सहा वेळेला गळती

By admin | Updated: February 3, 2015 17:23 IST

तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील ६0 टक्के भागाला तापी योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी तापी पाणीपुरवठा योजनेच्या सुकवद रॉ वॉटर पंपिंग स्टेशनजवळ तावखेडा फाट्याजवळील शेतातील मुख्य जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली. जीवन प्राधिकरणाकडे ही योजना असताना याच ठिकाणी तीन वेळा, तर मनपाकडे हस्तांतरित झाल्यानंतरही पुन्हा तीन वेळा गळती लागली. त्यामुळे रविवारी लागलेल्या गळतीमुळे साडेचार ते पाच फुटांचा संपूर्ण पाईपच बदलविण्यात आला. यासाठी एक लाख ८७ हजार रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागला आहे. सकाळी साडेनऊ वाजेपासून गळतीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. १५ लाख लीटर पाणी वायागळतीतून सुमारे १५ लाख लीटर रॉ वॉटरची नासाडी झाली. ही गळती सुकवद पंपिंग स्टेशनपासून जवळच असल्याने त्वरित पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे अधिक पाणी नासाडीचा धोका टाळता आला. पाणीपुरवठा प्रभावतीदेवपूर भागातील एम.बी.आर. जलकुंभ, नवरंगजलकुंभ, नेहरूनगर जलकुंभ तसेच बडगुजर जलकुंभ, मायक्रोवेव्ह जलकुंभ, बडगुजर जलकुंभ, मालेगाव रोडवरील पंपिंग स्टेशन, दसेरा मैदान जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ, मोहाडी उपनगर जलकुंभावरून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.२५ गळत्या काढल्यागेल्या वर्षी पाणीपुरवठा विभागाने या २५ वर गळत्या काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अद्यापही या जलवाहिनीवर दोन ठिकाणी मोठय़ा गळ्त्या आहेत. त्यात सोनगीरजवळील टोलनाका व ढंढाणे फाट्याजवळील गळतीचा समावेश आहे.

------

धुळे शहरातील ६0 टक्के भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९८९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने तापी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी सुखवद येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी एमबीआर जलकुंभापर्यंत आणली आहे. एक हजार मि.मी.ची ही जलवाहिनी आहे. ती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे तिला बदलण्याची गरज आहे. परंतु यासाठी २५ कोटींवर खर्च अपेक्षितआहे. त्यामुळे महापालिकेला सद्य:स्थितीत ती जलवाहिनी बदलणे शक्य नाही.