साहेब, दवाखान्यात जातोय... मेडिकलला जातोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:16+5:302021-04-12T04:34:16+5:30

राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने काही निर्बंध लावण्यात आले असता त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर वीकेंड लाॅकडाऊन सुरू झाला. प्रत्येक आठवड्यात शनिवार ...

Sir, going to the hospital ... going to the medical ... | साहेब, दवाखान्यात जातोय... मेडिकलला जातोय...

साहेब, दवाखान्यात जातोय... मेडिकलला जातोय...

Next

राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने काही निर्बंध लावण्यात आले असता त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर वीकेंड लाॅकडाऊन सुरू झाला. प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लाॅकडाऊन असणार आहे. या लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशीही सर्वत्र बंद होते. तरीही काही नागरिक विनाकारण फिरत असल्यामुळे अशांवर पोलिसांनी वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाहनधारकांना पकडल्यानंतर ठोकळेबाज उत्तर त्यांच्याकडून मिळत असल्याचे समोर आले. तरीदेखील पोलिसांनी काही जणांकडून दंडाची वसुली केेली.

शनिवारची कारवाई

शहरात लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलीस अधीक्षक व पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले. २४६ जणांकडून ३२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिवसभर ही मोहीम सुरू हाेती.

रविवारची कारवाई

रविवारी दुसऱ्या दिवशीसुध्दा विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती. जवळपास ३०० जणांकडून ३८ हजार रुपयांचा दंड वसूल झाला. ही मोहीम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच

लाॅकडाऊन आहे, बाहेर अनावश्यक फिरण्यास मज्जाव असतानादेखील काहीही कारण नसताना शहरात फिरणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी दिसून आली. ठोकळेबाज उत्तरे त्यांच्याकडून मिळत होती. काहींचे तर सारखेच कारण होते. दवाखाना आणि मेडिकल दुकान ही ठरलेली कारणे सांगण्यात येत होती.

Web Title: Sir, going to the hospital ... going to the medical ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.