शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा दाखल्यांमध्ये येणार सारखेपणा!

By admin | Updated: March 9, 2017 23:29 IST

धुळे : राज्यभर सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात एकसारखेपणा आणण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

धुळे : राज्यभर सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात एकसारखेपणा आणण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे  सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरावरून देण्यात आलेल्या सुधारित नमुन्याचा वापर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.सुधारित नमुन्यास मान्यताशाळा सोडल्याचा दाखला व जनरल रजिस्टरच्या सुधारित नमुन्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात नुकतेच आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात व जनरल रजिस्टरमध्ये बदल करावा लागणार आहे. हा शासन निर्णय सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांना हा निर्णय लागू राहणार आहे. नवीन नमुन्यात छपाईचे आदेशसर्व शाळा प्रमुखांना जनरल रजिस्टर व शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रांची शासनाने दिलेल्या नमुन्यात छपाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एकवाक्यता नसल्याने संभ्रमसध्या शाळा-शाळांमधून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात एकवाक्यता नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जनरल रजिस्टरमधील नोंदीत राज्यभर एकवाक्यता असणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती.सरल प्रणालीसाठीही बदल तसेच सरल प्रणालीमार्फत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी काही बदल करणे आवश्यक होते. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणकोणत्या नोंदणी आवश्यक आहेत, याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांचे अभ्यासक्रम राबविणाºया शाळांसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जनरल रजिस्टरमध्ये राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. तसेच याची अंमलबजावणी यावर्षीपासूनच होणार आहे.यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ७ मार्च रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.जनरल रजिस्टरमध्येही राहणार बदलजनरल रजिस्टरमध्ये दाखल्यातील सर्व नोंदी, दाखला मिळाल्याचा दिनांक व पालक स्वाक्षरी, नोंदी अचूक असल्याची पालकाची स्वाक्षरी आदी बाबींचा समावेश असणार आहे. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत व महत्त्वाचा दस्तावेज असतो. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसºया शाळेत प्रवेश घेणे, जातीचा दाखला व इतर अनेक बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण ओळखच असते. यामध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी राज्यस्तरावरून बºयाच दिवसापासून प्रयत्न सुरू होते.