शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण केंद्राचे शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

शहरातील नंदनवन बँक कॅालनी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी रात्रीच क्रीडा संकुल येथे असलेल्या पंचवटी ग्राहक तक्रार निवारण ...

शहरातील नंदनवन बँक कॅालनी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी रात्रीच क्रीडा संकुल येथे असलेल्या पंचवटी ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर तक्रार नोंदविण्यासाठी वारंवार फोन केला. मात्र या क्रमांकावरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. या कॅालनी परिसरात कोराना पॅाझिटिव्ह असलेल्या काही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. मात्र वीजपुरवठा नसल्याने, अनेकांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. लहान मुले रात्रभर झोपू शकली नाहीत.

दरम्यान काहींनी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर पहाटे तीन वाजता तक्रार नोंदवली. मात्र त्याची दखल सकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आली नाही. अखेर या भागातील काही नागरिक सकाळी ५ वाजता २४ तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तक्रार निवारण केंद्रावर गेले असता, ते बंदच होते. सकाळी सात वाजता या कार्यालयाचे प्रमुख असलेल्या भामरे यांच्या भ्रमणध्वनीवर तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही. काहीजण पुन्हा या कार्यालयात केले. बंद अवस्थेत असलेल्या शटरला कुलूप नसल्याने, काहींनी शटर उघडून पाहिले असता, तेथे कोणीही आढळून आले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर पंचवटी ग्राहक तक्रार निवारण केंद्राच्या शेजारीच तुळशीराम नगर ग्राहक तक्रार निवारण केंद्र आहे. ते सुध्दा बंद होते.

अखेर तब्बल आठ तासांनंतर या भागात वीज पुरवठा सुरू झाला. तक्रार निवारण केंद्राद्वारे वेळीच तक्रार घेतली असती तर नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.